वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (ईसीटीए)  परिवर्तनकारी असून,  व्यापार आणि गुंतवणुकीला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा मार्ग प्रशस्त करणारा : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज द्विपक्षीय व्यापार फक्त दुप्पट नाही तर अनेकपटींनी वाढवण्याइतकी प्रचंड क्षमता आहे: पीयूष गोयल
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                09 MAR 2023 8:12PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 9 मार्च 2023
 
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले की भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान स्वाक्षरी केलेला आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (ECTA) हा एक परिवर्तनकारी करार आहे जो व्यापार आणि गुंतवणुकीच्या पुढील स्तरावरील   संभाव्य मार्ग प्रशस्त करणारा आहे. ते आज मुंबईमध्ये आयोजित भारत-ऑस्ट्रेलिया  मुख्य कार्यकारी अधिकारी  मंचाला मार्गदर्शन  करत होते. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन गुंतवणूकदारांच्या मोठ्या संख्येबद्दल तसेच सहभागी झालेल्या प्रमुख भारतीय व्यावसायिक घराण्यांचे मनापासून कौतुक केले. ऑस्ट्रेलियन किनार्यावरून भारताला भेट देणारे हे सर्वात जास्त विवेकी आणि उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल हे ऑस्ट्रेलियन सरकारचे व्यापार आणि पर्यटन मंत्री सीनेटर डॉन फॅरेल,   यांच्यासमवेत या  मुख्य कार्यकारी अधिकारी मंच मध्ये सहभागी झाले होते.
केंद्रीय मंत्री गोयल यांनी नमूद केले की, द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे सध्या जे  उद्दिष्ट भारतीय आणि ऑस्ट्रेलियन उद्योगांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निश्चित केले आहे, त्याचा पुनर्विचार करावा  कारण या  दोन्ही देशांमधील व्यापार फक्त दुप्पट नाही तर अनेक पटींनी वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे.
दोन्ही देशांमधील सतत वाढणाऱ्या व्यापार आणि गुंतवणुकीचा फायदा घेण्यासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभाग (DPIIT), वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि भारतीय उद्योग परिसंघ (CII) द्वारे या मंचाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही मंत्र्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया  मुख्य कार्यकारी अधिकारी  मंचाच्या  बैठकीचे स्वागत केले आणि दोन्ही बाजूंच्या व्यवसायांना उदयोन्मुख आर्थिक आणि गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित केले. दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय गुंतवणुकीच्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले आणि एकमेकांच्या फायद्यासाठी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल आणि मजबूत करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. 
पंतप्रधान अँथनी अल्बानीज  यांच्या उपस्थितीत भारतीय उद्योग महासंघ आणि ऑस्ट्रेलियन व्यापार परिषदेमध्ये  चार वर्षांच्या मुदतवाढीचा सामंजस्य करारही करण्यात आला. ही भागीदारी उभय देशांमधील व्यावसायिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी कार्य करेल.
 
* * *
S.Bedekar/G.Deoda/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1905442)
                Visitor Counter : 210