रेल्वे मंत्रालय
ऊर्जा क्षेत्राकडून रेकची अपेक्षित मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे कोळसा वाहतुकीला प्राधान्य देणार
प्रविष्टि तिथि:
09 MAR 2023 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2023
चालू आर्थिक वर्षात (फेब्रुवारीपर्यंत) भारतीय रेल्वेची कोळसा वाहतूक टनेज आणि एनटीकेएम च्या संदर्भात 11.92% आणि 24.51% ने वाढली आहे. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल-फेब्रुवारी) विविध स्त्रोतांकडून ऊर्जा क्षेत्रासाठी 408 रेक प्रतिदिन लोड केले जातात. मागील वर्षी 344 रेक प्रतिदिन लोड केले जात होते. येत्या आर्थिक वर्षात उर्जा क्षेत्राकडून रेकची अपेक्षित मागणी पूर्ण करण्यासाठी, पुढील कार्यवाही करण्यात आली आहे:-
- कोळसा वाहून नेणाऱ्या उच्च क्षमतेच्या वाघिणींचा समावेश - एप्रिल-22 ते जानेवारी-23 या कालावधीत 7692 BOXNHL आणि 1052 BOBRN वाघिणी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
- चालू आर्थिक वर्षात, भारतीय रेल्वेच्या ताफ्यात फेब्रुवारी-23 अखेरपर्यंत 1018 मालवाहू लोकोमोटिव्ह जोडले गेले आहेत.
- 2022-23 मध्ये 4500 किमी नवीन ट्रॅक कार्यान्वित होणे अपेक्षित आहे, त्यापैकी बहुतांश ट्रॅक कोळसा वाहतूक मार्गांवर आहेत.
- पुढील काही वर्षांतील वाढती मागणी लक्षात घेऊन, सुमारे 100 प्रकल्पांमध्ये एक लाख कोटी रुपयांच्या नियोजित गुंतवणूकीसह उूर्जा मार्गिकेच्या सर्वसमावेशक नियोजन करण्यात आले आहे.
* * *
S.Bedekar/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1905403)
आगंतुक पटल : 172