कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री, किरेन रिजिजू यांच्या हस्ते ‘जनऔषधी दिवस’ च्या सांगता दिन सोहळ्याचा प्रारंभ

Posted On: 07 MAR 2023 4:52PM by PIB Mumbai

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री, किरेन रिजिजू यांनी आज नवी दिल्लीतील शास्त्री भवन येथे जनऔषधी दिवसाच्या सांगता दिन सोहळ्याला उपस्थिती लावली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, औषध निर्माण विभागाचे सहसचिव रजनेश टिंगल आणि पीएमबीआय चे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ गौतम शर्मा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. नवी दिल्ली येथे जनऔषधी जन चेतना अभियान सोहोळ्याचा प्रारंभ करण्यासाठी जनऔषधी रथला केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी हिरवा झेंडा दाखवला. या उदघाटनपर कार्यक्रमाने देशभरात 5 व्या जनऔषधी सोहोळ्याची सुरुवात झाली .

सर्वांना किफायतशीर किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयाच्या औषध निर्माण विभागाकडून प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (पीएमबीजेपी) सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत, जनऔषधी केंद्रे म्हणून ओळखली जाणारी समर्पित दुकाने जेनेरिक औषधे पुरवण्यासाठी उघडली जातात. देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जन औषधी दुकान असावे या उद्देशाने नोव्हेंबर, 2008 मध्ये जन औषधी योजना सुरू करण्यात आली.

***

Nilima C/Vasanti/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1904970)
Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil