निती आयोग
नीती आयोग आणि आशियायी विकास बँकेच्या स्वतंत्र मूल्यमापन विभागाच्या (आयईडी) वतीने ' ब्रिज ओव्हर ट्रबल्ड वॉटर’ या शीर्षकाखाली परिसंवादाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
06 MAR 2023 6:03PM by PIB Mumbai
जल सुरक्षा बळकट करण्यासाठी आणि जोखीम कमी करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी आणि आशियायी विकास बँकेच्या स्वतंत्र मूल्यमापन विभागाच्या सहकार्याने नीती आयोगाने ‘ब्रिज ओव्हर ट्रबल्ड वॉटर’ या शीर्षकाखाली परिसंवादाचे आयोजन केले होते.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन आयईडीचे महासंचालक इमॅन्युएल जिमेनेझ यांनी केले तसेच विकास देखरेख आणि मूल्यमापन कार्यालयाचे (डीएमईओ) महासंचालक संजय कुमार यांनी समारोपाचे भाषण केले. जल क्षेत्रातील आशियायी विकास बँकेच्या च्या सहभागावर आयईडीच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या मुल्यांकन अहवालातल्या प्रमुख बाबींवर या परिसंवादात चर्चा झाली.
***
Nilima C/Sonal C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1904725)
आगंतुक पटल : 186