कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वृद्ध नागरिकांच्या जीवनमान सुलभतेसाठी पेन्शन वितरण बँक पोर्टल्स, अनुभव, सीपीइएनजीआरएएमएस , सीजीएचएस- केंद्र सरकारी आरोग्य योजना या सारखी सर्व पोर्टल नव्याने तयार केलेल्या "एकात्मिक पेन्शनर्स पोर्टल" च्या रूपात एकाच पोर्टलमध्ये एकत्रित केली जातील, केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

Posted On: 06 MAR 2023 4:28PM by PIB Mumbai

वृद्ध नागरिकांच्या जीवनमान सुलभतेसाठी निवृत्तीवेतन (पेन्शन) वितरण बँक पोर्टल्स, अनुभव, केंद्रीकृत पेन्शनर्स तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (सीपीईएनग्राम), केंद्र सरकारी आरोग्य योजना (सीजीएचएस) इत्यादी सर्व पेन्शन पोर्टल्स नव्याने तयार केलेल्या "एकात्मिक पेन्शनर्स पोर्टल" (https://ipension.nic.in) च्या रूपात एकाच पोर्टलमध्ये एकत्रित केली जातील. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज ही माहिती दिली. ते मध्यप्रदेशातील भोपाळ येथे बॅंकर्स जागरूकता कार्यशाळेत बोलत होते. "

जीवन सुलभ करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन" या पंतप्रधानांच्या व्हिजनच्या अनुषंगाने, हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. बँक बदलणे, जीवन प्रमाणपत्र सादर करणे, निवृत्तीवेतन धारकाचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे पेन्शनधारकांचे प्रमाणपत्र, पेन्शन स्लिप आणि पेन्शन स्लिपची पुनर्प्राप्ती, आयकर कपातीचा डेटा/फॉर्म 16, पेन्शन पावतीची माहिती यासारख्या निवृत्तीवेतन 

धारकांना बँकांशी निगडित येणाऱ्या कागदपत्र सादर करण्याच्या समस्या त्यामुळे कमी होणार आहेत. पेन्शन वितरण करणार्‍या बँकांची संकेतस्थळेही एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलसह एकत्रित केली जातील.

भारतीय स्टेट बॅंक  आणि कॅनरा बँकेच्या पेन्शन सेवा पोर्टलचे भविष्य पोर्टलसह एकत्रीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे, याकडेही मंत्र्यांनी लक्ष वेधले. या एकत्रीकरणामुळे, पेन्शनधारकांना आता त्यांची पेन्शन स्लिप, जीवन प्रमाणपत्र कधी सादर करायचे आहे याची माहिती आणि फॉर्म-16 एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलद्वारे मिळू शकेल. सर्व 18 पेन्शन वितरण बँका एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलमध्ये एकत्रित केल्या जातील अशी माहितीही त्यांनी दिली.

कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन विभाग  केवळ सेवेत कार्यरत/निवृत्त कर्मचाऱ्यांचीच काळजी घेत नाही तर निवृत्तीवेतनधारकांच्या राहणीमानात सुलभता येण्यासाठीही काम करेल आणि डिजिटल लाइफ सर्टिफिकेट हे या दिशेने आणखी एक पाऊल आहे, असे डॉ जितेंद्र सिंग म्हणाले.

पेन्शन विभागाने 22 नोव्हेंबर मध्ये फेस ऑथेंटिकेशन मोहिमेद्वारे देशव्यापी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट मोहीम हाती घेतली असून त्यामुळे 30 लाख पेन्शनधारकांनी त्यांचे जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने सादर केले आहे.

अशा पद्धतीने आयोजित कार्यशाळांमध्ये दोन मार्गांनी उत्कृष्टपणे प्रशिक्षण दिले गेले. त्यामुळे पेन्शनधारकांच्या बँकेशी संबंधित तक्रारी कमी करण्यासाठी मदत होणार आहे. पेन्शन व्यवहार करणार्‍या बँक अधिकार्‍यांना या विभागाने पेन्शनधारकांच्या जीवन सुलभतेसाठी घेतलेल्या/जारी केलेल्या सर्व उपायांची जाणीव या कार्यशाळांमध्ये करून दिली.

बॅंकांकडून पेन्शनर्सच्या आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या अपेक्षांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा विभाग अत्यंत गंभीर असल्याचा ठोस संदेश अशा प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमांमधून दिला जातो.

***

Nilima C/Prajna/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1904714) Visitor Counter : 256


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu