ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

धोकादायक वस्तूंच्या वाहतुकीमध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी


देशभरात धोकादायक सामग्रीची सुरक्षित हाताळणी आणि वाहतुकीसाठी नवे मापदंड निश्चित करण्यासाठी या मार्गदर्शक सूचना

Posted On: 06 MAR 2023 3:06PM by PIB Mumbai

धोकादायक वस्तूंच्या वाहतुकीमध्ये सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)  या भारताच्या  राष्ट्रीय मानक संस्थेने अलीकडेच  नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
 आयएस  18149:2023 - धोकादायक वस्तूंची वाहतूक - मार्गदर्शक सूचना ', या नावाने ओळखल्या जाणाऱ्या   या मार्गदर्शक सूचना भारतीय मानक ब्युरोच्या परिवहन सेवा विभागीय समिती, एसएसडी  01 अंतर्गत तयार करण्यात आल्या आहेत आणि देशभरात धोकादायक सामग्रीची  सुरक्षित हाताळणी आणि वाहतुकीसाठी एक नवीन मापदंड निश्चित करणे अपेक्षित आहे.
वाहतूक पद्धतींचे मानकीकरण करण्याच्या उद्देशाने, अपघातांचा धोका तसेच  जीवित आणि पर्यावरणाला होणारी संभाव्य हानी कमी करण्याच्या अनुषंगाने या  वस्तूंची वाहतूक सुरक्षित होईल हे सुनिश्चित करण्यासाठी बीआयएस मार्गदर्शक सूचना सहाय्य्यकारी ठरतील.

***

Nilima C/Sonal C/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1904621) Visitor Counter : 132