रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केरळमध्ये आयसीटीटी वल्लारपदम आणि कलमस्सेरी यांना जोडण्यासाठी 571 कोटी रुपये खर्चून चौपदरी राष्ट्रीय महामार्ग विकसित करण्यात आल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

प्रविष्टि तिथि: 06 MAR 2023 2:43PM by PIB Mumbai

सागरी आणि बंदर जोडणी पायाभूत सुविधा देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. केरळमध्ये आयसीटीटी (इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल) वल्लारपदम आणि कलमस्सेरीला जोडण्यासाठी 571 कोटी रुपये खर्चून चौपदरी राष्ट्रीय महामार्ग (एनएच) विकसित करण्यात आल्याचे त्यांनी ट्विट संदेशांमधे सांगितले. 

कोचीन येथे अरबी समुद्राच्या बॅकवॉटरने व्याप्त 8.721 किमी क्षेत्रात, बंदराला जोडणारा महामार्ग या प्रकल्पात समाविष्ट आहे. हा महामार्ग मालवाहतुकीसाठी उत्तर-दक्षिण कॉरिडॉरला कोचीन बंदराशी जोडतो. त्यामुळे मालवाहतूक सुलभ होते असे त्यांनी सांगितले.

या शिवाय, हा महामार्ग समुद्रकिनारी असलेल्या आठ गावांच्या दळणवळणाला चालना देतो आणि या क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतो, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, नागरिकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या कालबद्ध, किफायतशीर, उच्च दर्जाच्या आणि शाश्वत रस्ते पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे गडकरी म्हणाले.

****

Nilima C/VG/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1904599) आगंतुक पटल : 169
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Telugu