आयुष मंत्रालय
आयुष मंत्रालयाने पंतप्रधान योग पुरस्कार 2023 साठी अर्ज/नामांकने मागवली आहेत
आयुष मंत्रालयाने पंतप्रधान योग पुरस्कार 2023 साठी अर्ज/नामांकने मागवली आहेत
प्रविष्टि तिथि:
06 MAR 2023 11:33AM by PIB Mumbai
आयुष मंत्रालयाने पंतप्रधान योग पुरस्कार 2023 साठी अर्ज/नामांकने मागवली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योग या विषयी विकास आणि प्रोत्साहनासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाकरता हे पुरस्कार दिले जातात. दोन राष्ट्रीय पुरस्कार भारतीय संस्थांना आणि दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारतीय/विदेशी संस्थांना दिले जातील. नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनी (21 जून 2023) विजेत्यांची घोषणा केली जाईल.
वर्ष 2023 च्या पुरस्कारासाठी अर्ज/नामांकने प्रक्रिया सध्या मायजीओव्ही (MyGov) मंचावर (https://innovateindia.mygov.in/pm-yoga-awards-2023/) सुरु केली आहे. आयुष मंत्रालयाच्या संकेतस्थळ आणि राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर देखील याची लिंक उपलब्ध असेल. या वर्षीच्या पुरस्कारांसाठी अर्ज/नामांकने प्रक्रिया 31 मार्च 2023 पर्यंत खुली असेल.
निवड प्रक्रिया दोन स्तरावर होणार आहे. छाननी समिती आणि मूल्यांकन समिती (ज्युरी) या दोन समित्या यासाठी आयुष मंत्रालयाद्वारे स्थापन केल्या जातील. मूल्यमापन समितीचे (ज्युरी) अध्यक्ष कॅबिनेट सचिव असतील आणि त्यात पंतप्रधानांचे सल्लागार, परराष्ट्र सचिव, आयुष मंत्रालयाचे सचिव आणि इतर सदस्यांचा समावेश असेल. पुरस्कार विजेत्यांच्या नावाला अंतिम रूप देण्यासाठी निवड आणि मूल्यमापनाचे निकष ते ठरवतील.
यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर जनसमुदायाचा सहभाग सुनिश्चित करून साजरा करण्याची योजना आयुष मंत्रालय आखत आहे. मंत्रालय डब्ल्यूएचओ माययोग अॅप, नमस्ते अॅप, वाय-ब्रेक अॅप्लिकेशन आणि विविध लोककेंद्रित उपक्रम तसेच कार्यक्रमांच्या सहाय्याने योग लाभांबद्दल मंत्रालय प्रचार करेल. आंतरराष्ट्रीय योग दिन प्रतिज्ञा, मतदान/सर्वेक्षण, आंतरराष्ट्रीय योग दिन गीत (जिंगल), आंतरराष्ट्रीय योग दिन प्रश्नमंजुषा आणि "योग माय प्राइड" छायाचित्र स्पर्धा इत्यादी सारखे विविध उपक्रम मायजीओव्ही मंचावर सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
*****
JaideviPS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1904517)
आगंतुक पटल : 254