कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रवर्तित केलेल्या लहान शेतकरी कृषी-व्यवसाय संघाने हाती घेतली मिलेट्स गिव्हवे ही विशेष विपणन मोहीम
Posted On:
05 MAR 2023 5:33PM by PIB Mumbai
मिलेट्स गिव्हवे ही एक विशेष विपणन मोहीम आहे जी लहान शेतकऱ्यांच्या कृषी-व्यवसाय संघाने हाती घेतली आहे, ही संस्था कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारे प्रवर्तित आहे. लहान शेतकरी कृषी-व्यवसाय संघाच्या या मोहिमेचा उद्देश शेतकरी उत्पादक संस्थे अंतर्गत कार्यरत असलेल्या शेतकऱ्यांकडून थेट खरेदीला प्रोत्साहन देणे, तसेच देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधार देणे हा आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय प्रणीत लहान शेतकरी कृषी-व्यवसाय संघाच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मनिंदर कौर द्विवेदी, यांनी सांगितले की, भारतीय विक्रेत्यांसाठी शेतकरी उत्पादक संस्थेच्या माध्यमातून भारतात तयार केलेल्या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) च्या My Store द्वारे भरड धान्य विकणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्थांकडून नागरिकांना थेट खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे
शेतकरी उत्पादक संस्थेमध्ये सामील होण्यापूर्वी शेतकरी पारंपरिक शेती पद्धती वापरून विविध पिकांच्या पारंपारिक बियाणांची लागवड करत असत. नवीन पीक म्हणून या शेतकऱ्यांच्या पिकांच्या यादीमध्ये भरड धान्याची भर पडली. शेतकरी उत्पादक संस्थेने अलीकडेच स्वतःचे एक दालन स्थापन केले आहे, जेथे सदस्य कमी किमतीत उच्च दर्जाचे बियाणे, खत आणि इतर घटक खरेदी करू शकतात.
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904411)
Visitor Counter : 275