रेल्वे मंत्रालय
रेल्वे सुरक्षा दलातर्फे फेब्रुवारी 2023 मध्ये महिनाभराची विशेष मोहीम पूर्ण
Posted On:
03 MAR 2023 6:16PM by PIB Mumbai
रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र, प्रवासी आणि त्यांच्याशी संबंधित बाबींच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या अनिवार्य जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी आरपीएफकडे इतर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रवाशांचा बचाव आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात, रेल्वे सुरक्षा दल (RPF) रेल्वे सुरक्षा वाढविण्यासाठी विशिष्ट ध्येय ठेवून विशेष मोहीम राबवते. फेब्रुवारी 2023 मध्ये आरपीएफची कामगिरी रेल्वे सुरक्षेच्या तीन आव्हानांवर केंद्रित होती.
या महिनाभराच्या मोहिमेदरम्यान, या धोक्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आणि 12,000 हून अधिक ठिकाणी पार्सल नोंदणी आणि वितरण ठिकाणे तपासण्यात आली आणि जवळपास 2,800 पार्सल कोणत्याही प्रकारची प्रतिबंधात्मक/स्फोटके/आक्षेपार्ह/धोकादायक द्रव्ये, शस्त्रे/दारूगोळा/इतर बेकायदेशीर वस्तू वाहून नेत नाहीत, याची खात्री करण्यासाठी मार्गात तपासणी करण्यात आली. या कालावधीत सुमारे 15 लाख (अंदाजे) रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.
***
S.Bedekar/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1903971)
Visitor Counter : 189