सांस्कृतिक मंत्रालय

सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘धारा: भारतीय ज्ञान प्रणालीसाठी  मुक्तछंद’/'धारा: ओड टू इंडियन नॉलेज सिस्टीम्स' या वैशिष्ठ्यपूर्ण  उपक्रमाला एक वर्ष पूर्ण


पहिल्या वर्षात वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ठ्यपूर्ण संकल्पनांवर 10 परिषदांचे यशस्वी आयोजन

Posted On: 03 MAR 2023 6:04PM by PIB Mumbai

 

सांस्कृतिक मंत्रालयाने स्वातंत्र्याचा  अमृतमहोत्सव या  अंतर्गत हाती घेतलेल्या  'धारा: ओड टू इंडियन नॉलेज सिस्टीम्स'/‘धारा: भारतीय ज्ञान प्रणालीसाठी  मुक्तछंद’' या वैशिष्ठ्यपूर्ण  आणि प्रमुख उपक्रमाला फेब्रुवारी २०२३ मध्ये एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभर चाललेल्या उपक्रमांदरम्यान भागधारकांचा सहभाग, जनजागृती करण्यात यश मिळाले आणि भारतीय ज्ञान प्रणालीच्या  बहुविध कार्यक्षेत्रांचे पुनरुज्जीवन आणि चालना यासाठी  एक आराखडा तयार करण्यात मदत झाली. भारतीय संस्कृतीच्या कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या विशिष्ठ क्षेत्रांना समर्पित व्याख्याने आणि चर्चांची मालिका म्हणून या कार्यक्रमाची संकल्पना करण्यात आली.

धारा एका युगातून दुस-या युगात ज्ञान आणि हुशारीचा  'निरंतर  प्रवाह' या कल्पनेला मूर्त रूप देते, जी काळानुसार स्वीकारली जाते, पारखली जाते  आणि कालांतराने त्यात बदल केला जातो जेणेकरून  आपण विविध क्षेत्रात अंतर्ज्ञानाचा पुढील टप्पा गाठण्यासोबतच आपल्या भूतकाळापासून उपलब्ध कार्याबाबतही ती अवलंबू शकू. नवी दिल्ली येथे एआयसीटीई अर्थात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदस्थित शिक्षण मंत्रालयाचा भारतीय ज्ञान प्रणाली (आयकेएस) विभाग हा धारा उपक्रमासाठी प्रमुख कार्यांव्ययन भागीदार आहे.

 

धारा मालिकेची  सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी धारा मालिकेची सुरुवात कशी झाली ते सांगितले.  “ही वेळ आहे, इतिहासाची पाने आपण उलटत आहोत  आणि या गोष्टी भारताशी संबंधित आहेत, हे आपल्याला माहित नाही ते जाणून घेऊन त्यांचा उत्सव साजरा करत आहोत; आपल्या  योगदानाचा दावा करण्याची  जे उपजत  भारताचे आहे आणि जगाला मानवतेच्या भरभराटीसाठी आणि सहअस्तित्वासाठी एक चांगले स्थान बनविण्याच्या दिशेने भारताच्या योगदानाचा वारसा पुढे नेण्याची.''असे ते म्हणाले.

धारा मालिका, ज्यापैकी 10 परिषदा आतापर्यंत यशस्वीरित्या आयोजित केल्या गेल्या.  त्या ज्या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ठ्यपूर्ण संकल्पनांवर  आयोजित केल्या गेल्या त्यांची नावे अशी आहेत : भारताचे गणितात योगदान, भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका, धारा खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर आयकेएस  मेळा आणि संस्कृतीची भूमिका, आयुर्वेदावरील आयुर्धारा (I आणि II), विविध राष्ट्रीय युद्ध परंपरांवर राष्ट्रीय मार्शल आर्टस  मेळा, भारताच्या गौरवशाली सागरी परंपरांवर 'समुद्रमंथन', संगीता आणि नाट्य परंपरा आणि भारतीय रसायनशास्त्रावरील रसायनशास्त्र. विविध मंत्रालये, अकादमी, उद्योग व्यवसायी, ज्ञान भागीदार आणि इतर भागधारकांना एकत्र आणून धोरणात्मक सहयोग निर्माण करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट होते. धोरणात्मक सहयोग वैज्ञानिक संश्लेषण, प्रसार आणि पारंपरिक ज्ञान प्रणालींचे संरक्षण यासाठी काटेकोर आराखड्याचे एकत्रीकरण सक्षम करू शकते आणि त्याचवेळी सामान्य नागरिकांपर्यंत ते पोहोचणे सुनिश्चित करू शकेल.

या मालिकेत नियोजित पुढील परिषदा भारतातील धातूशास्त्र, कृषी आणि प्राचीन आर्थिक विचार आणि परंपरांवर आधारित आहेत.

परिषदांच्या तपशीलांसाठी येथे क्लिक करा

एक स्वतंत्र आधुनिक राष्ट्र म्हणून आपला इतिहास 75 वर्षांचा आहे परंतु आपली संस्कृती  5,000 वर्षांहून अधिक जुनी आहे. मानवी ज्ञानात भारताचे योगदान मोठे  आहे, आणि स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांचे औचित्य साधत   अमृत महोत्सवाच्या  निमित्ताने या दिशेने समन्वित  आणि केंद्रित प्रयत्न सुरू करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ कोणती असेल!.

***

S.Bedekar/S.Kakade/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1903963) Visitor Counter : 172


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada