आदिवासी विकास मंत्रालय

केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते 4 मार्च रोजी झारखंड येथील सरायकेला येथे वाहन उद्योग कौशल्य विकास परिषदेने आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

Posted On: 02 MAR 2023 2:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2023


केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा 4 मार्च 2023 रोजी सरायकेला जिल्ह्यातील काशी साहू महाविद्यालयात  वाहन उद्योग कौशल्य विकास परिषदेने आयोजित केलेल्या शिकाऊ रोजगार मेळाव्याचे उद्घाटन  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून करतील.

हा भव्य रोजगार मेळावा सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीचे एक आगळेवेगळे उदाहरण असेल आणि त्यात  वाहन उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या उपस्थित राहतील. आदिवासी युवकांना दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी प्रशिक्षित तंत्रज्ञ म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा आहे. जवळपासच्या परिसरातून हजारो आदिवासी उमेदवार या मेळाव्याला उपस्थित राहतील.

झारखंडमधील विद्यार्थ्यांसाठी आणि वाहन उद्योग क्षेत्रासाठी हा रोजगार मेळावा एक महत्त्वाचा उपक्रम असेल आणि आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी आणि कंपन्यांना योग्य प्रतिभा शोधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल. तसेच आदिवासी तरुणांना त्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी, कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि नामांकित संस्थांमध्ये करण्याची योग्य संधी उपलब्ध करून देईल.

सप्टेंबर 2022 मध्ये, टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे अशाच प्रकारची भरती मोहीम आयोजित करण्यात आली होती. खुंटी, सरायकेला, चाईबासा आणि सिमडेगा येथे 2 दिवसीय भरती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. खुंटी येथील एकूण 488 मुलींपैकी 387, सरायकेला येथील 331 मुलींपैकी 152, सिमडेगा येथील 1071 मुलींपैकी 846 आणि चाईबासा येथील 715 मुलींपैकी 513 मुली या भरती मोहिमेत पात्र ठरल्या होत्या आणि त्या टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या  तामिळनाडू येथील  होसूर प्लांटमध्ये काम करतायेत.

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होत असलेल्या सेवा पंधरवड्या  दरम्यान आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या प्रयत्नातून ही मोहीम सुरू करण्यात आली. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातून 2600 हून अधिक मुली व युवतींनी भरती मोहिमेत सहभाग घेतला, त्यापैकी 1898 मुलींची 2 दिवसांत निवड करण्यात आली.

झारखंड आणि देशातील इतर आदिवासी भागात  वाहन उद्योग  क्षेत्राच्या वाढीला पाठिंबा देण्यासाठी भविष्यात असेच कार्यक्रम आयोजित केले जातील अशी आशा आहे.


S.Thakur/G.Deoda/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1903624) Visitor Counter : 138


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu