कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

हरियाणातील गुरुग्राम येथे आज झालेल्या जी-20 राष्ट्रांच्या पहिल्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाच्या बैठकीत, फरारी आर्थिक गुन्हेगारांचे जलद प्रत्यार्पण आणि मालमत्ता जप्त करण्यासाठी जी-20 राष्ट्रांना बहुपक्षीय कारवाई करण्याचे भारताचे आवाहन


अतिश्रीमंत व्यक्तींनी केलेल्या फसवणुकीमुळे, सुमारे 272 अब्ज अमेरीकी डॉलर्सचे नुकसान झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सुमारे 180 अब्ज अमेरीकी डॉलर्सची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने हस्तांतरित केली : डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 01 MAR 2023 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मार्च 2023

हरियाणातील गुरुग्राम येथे आज जी20 राष्ट्रांची पहिली भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची बैठक झाली. भारताने यात जी-20 राष्ट्रांना फरारी आर्थिक गुन्हेगारांचे जलद प्रत्यार्पण आणि देशांतर्गत तसेच परदेशातील मालमत्तेची वसुली करण्यासाठी बहुपक्षीय कृती अवलंबण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी भ्रष्टाचाराबाबत शून्य सहिष्णुतेची प्रशासकीय परिसंस्था विकसित करण्याची कल्पना मांडली आहे असे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान;  राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान;  पीएमओ, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले.सह-अध्यक्ष इटली समवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

अतिश्रीमंत व्यक्तींनी केलेल्या फसवणुकीमुळे, सुमारे 272 अब्ज अमेरीकी डॉलर्सचे नुकसान झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सुमारे  180 अब्ज अमेरीकी डॉलर्सची  मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने हस्तांतरित केली आहे अशी माहिती डॉ जितेंद्र सिंह  यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

देश आणि परदेशातील गुन्ह्यांमधून जमवलेले उत्पन्न वेगाने जप्त करण्यासाठी यंत्रणा मजबूत केल्यास गुन्हेगारांना त्यांच्या मायदेशी परत जाण्यास भाग पाडले जाईल असा भारताचा दृष्टिकोन असा आहे असे डॉ जितेंद्र सिंह यांनी जी-20 प्रतिनिधींना सांगितले.

अधिक गुंतागुंतीच्या तसेच एफईओ संबंधित प्रकरणांमध्ये प्रगती करण्यात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रकरणात, उत्तम समन्वय, न्यायालयीन प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी खटले वेळेवर निकाली काढणे आणि संबंधित मालमत्तेची वसुली यासाठी द्विपक्षीय समन्वयापेक्षा बहुपक्षीय कृतीची आवश्यकता आहे असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

जागतिक आर्थिक सहकार्याचा प्राथमिक मंच म्हणून जी 20 ने भ्रष्टाचाराच्या संकटाशी लढा देण्यासाठी जागतिक प्रयत्नांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. 2010 मध्ये स्थापना झाल्यापासून, जी 20 भ्रष्टाचार प्रतिबंधक कार्य गट (एसीडब्लूजी) सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराचे निराकरण करण्यात आघाडीवर आहे, असेही ते म्हणाले.

“एक सुरक्षित आणि सुरक्षित जग ही आपली सामायिक जबाबदारी आहे.  चांगल्या शक्ती सहकार्य करतात तेव्हा गुन्हेगारी शक्ती कार्य करू शकत नाहीत. ” असे पंतप्रधान मोदींनी अनेक प्रसंगी सांगितले आहे याची आठवण डॉ जितेंद्र सिंह यांनी करून दिली.

सर्व राज्य पक्षांनी भ्रष्टाचाराविरुद्ध समान दृढनिश्चय प्रतिबिंबित करणे महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि त्याच्याशी लढा देण्याच्या ठोस उद्देशाने भारताच्या अध्यक्षतेखाली आणि इटलीच्या सह-अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार विरोधी कार्यगट तयार होईल,  असा विश्वास त्यांनी भाषणाचा समारोप करताना व्यक्त केला.  

 

S.Bedekar/V.Ghode/P.Malandkar

 



(Release ID: 1903492) Visitor Counter : 133