उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवोन्मेष, संशोधन, उपक्रम, उद्योजकता हे आपल्या डीएनए मध्येच असून, आपल्याला तेच करायचे आहे : उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन


नवीन शैक्षणिक धोरण -2020 ही परिवर्तनकारी सुधारणा असून आपल्याला पदवी - केंद्रित संस्कृतीपासून दूर करेल आणि उत्पादकतेच्या मार्गावर नेईल असा उपराष्ट्रपतींना विश्वास

Posted On: 01 MAR 2023 7:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मार्च 2023

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारतीय नवोन्मेष, संशोधन आणि उद्योजकतेचं सामर्थ्य अधोरेखित करत, देशवासियांनी भारताच्या वाढत्या यशाचा अभिमान बाळगायला हवा,असे आवाहन केले आहे. ते आज बंगळूरू इथे गोकुळ एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, दिवंगत डॉ. एम. एस. रामैया यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला मार्गदर्शन  करताना बोलत होते.

उपराष्ट्रपतींनी सामाजिक परिवर्तन घडवण्यामधील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

भारत, हे प्राचीन काळापासून नालंदा, तक्षशीला, वल्लभी आणि विक्रमशीला यासारख्या मोठ्या  शैक्षणिक केंद्रांचे माहेरघर असल्याचे त्यांनी नमूद केले. धनखड यांनी भारताच्या शिक्षण क्षेत्रात अधिक सर्वसमावेशकता आणि सर्वोत्तमता आणण्यात नवीन शैक्षणिक धोरणाचे असलेले महत्व अधोरेखित केले. नवीन शैक्षणिक धोरण-2020 परिवर्तन घडवणारे (गेम चेंजर) असल्याचं नमूद करून ते म्हणाले, हे आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये परिवर्तन घडवेल, आपल्याला पदवी केंद्रित संस्कृतीपासून दूर नेईल आणि उत्पादनक्षम मार्गावर घेऊन जाईल.

संसद हे सरकारला उत्तरदायी धरण्याचे व्यासपीठ असल्याचे सांगून, उपराष्ट्रपतींनी सभागृहातल्या वाढत्या गोंधळाच्या घटनांबद्दल नापसंती व्यक्त केली. ही प्रवृत्ती रोखण्यासाठी जनआंदोलनाचे आवाहन करून, सर्वांसाठी अनुकरणीय अशा वर्तनाचे उदाहरण ठेवण्यासाठी संसद सदस्यांचे मन वळवण्यासाठी आणि त्यांना विनंती करण्यासाठी युवा वर्गाने जनमत तयार करावे, असे त्यांनी आवाहन केले.   

भारताचे उपराष्ट्रपती म्हणून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर धनखड यांनी  कर्नाटक राज्याला दिलेली  ही पहिलीच भेट आहे. 

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, , कर्नाटक सरकारचे कायदा मंत्री जे.सी. मधुस्वामीगोकुळ एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. एम.आर. जयराम, गोकुळ एज्युकेशन फाउंडेशनचे उपाध्यक्ष एम. आर. सीताराम, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपराष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण जाणून घेण्‍यसाठी या लिकंवर क्लिक करावे   -

https://www.pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1903351

 

 

 

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1903469) Visitor Counter : 190