वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभाग (डीपीआयआयटी) करणार अर्थसंकल्पोत्तर वेबिनारचे सह-आयोजन


वेबिनारची संकल्पना -'अनलीशिंग द पोटेंशियल: इज ऑफ लिव्हिंग युजिंग टेक्नॉलॉजी'

Posted On: 27 FEB 2023 6:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2023

 

अर्थसंकल्पीय घोषणा आणि त्यांच्या पूर्ततेसाठीच्या धोरणांवर चर्चा करण्याकरिता, 28 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्पोत्तर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. वेबिनारचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केले असून, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) सह-आयोजक आहे. वेबिनारची संकल्पना ‘अनलीशिंग द पोटेंशियल: इज ऑफ लिव्हिंग युजिंग टेक्नॉलॉजी’ अर्थात ‘अव्यक्त क्षमता उपयोगात आणणे  : तंत्रज्ञानाद्वारे सुलभ राहणीमान’ ही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वेबिनारचे उदघाटन होणार आहे.

वेबिनारमध्ये 4 महत्वपूर्ण सत्रे असतील. डीपीआयआयटी द्वारे "विशेषत: छोट्या व्यवसायांसाठी तंत्रज्ञानाद्वारे व्यवसाय सुलभता" या विषयावरील महत्वपूर्ण सत्र 3 चे आयोजन केले जाईल. या सत्रात राष्ट्रीय एकल खिडकी प्रणाली, सामान्य व्यवसाय ओळखकर्ता म्हणून पॅन, केवायसी सुटसुटीत करणे , सर्वसमावेशक फाइलिंग प्रक्रिया, प्रयोगशाळा निर्मित हिरे, एमएसएमईसाठी विवाद से विश्वास योजना इत्यादी वैविध्यपूर्ण विषयांचा समावेश असेल.

या महत्वपूर्ण सत्रात उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राचा भरघोस सहभाग असेल. या सत्रात इनस्पेस - अंतराळ विभागाचे अध्यक्ष डॉ. पवन गोयंका, इंडियन व्हेंचर अँड अल्टरनेट कॅपिटल असोसिएशन (आयव्हीसीए) चे उपाध्यक्ष अमित पांडे, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री नॅशनल कमिटी ऑन अ‍ॅफर्मेटिव्ह अॅक्शनचे अध्यक्ष पिरुझ खंबाटा, अर्न्स्ट अँड यंग (EY) चे कार्यकारी संचालक विश्वनाथन रविचंद्रन, फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो अँड स्मॉल अँड मिडियम एंटरप्रायझेस (FISME) चे महासचिव अनिल भारद्वाज, आयआयटी मद्रासचे प्रा. एमएस रामचंद्र राव, आयआयटी दिल्लीचे डॉ. नीरज खरे आणि डॉ. जयजित भट्टाचार्य डिजिटल इकॉनॉमी पॉलिसी रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. जयजित भट्टाचार्य यांच्या योगदानाचा समावेश असेल.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये व्यवसाय सुलभता आणि जीवन सुखकर होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तंत्रज्ञाचे मोठे योगदान राहील. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध मंत्रालये, विभाग आणि उद्योग संघटना, शैक्षणिक संस्था यांसारख्या इतर हितधारकांमध्ये समन्वय आणि सहकार्य आवश्यक आहे.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1902839)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu