आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार, आणि केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री श्री भगवंत खुबा यांच्या उपस्थितीत 'औषधे: दर्जा नियमन आणि अंमलबजावणी' या विषयावर 2 दिवसांच्या चिंतन शिबिराचं केले उद्घाटन

Posted On: 26 FEB 2023 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 फेब्रुवारी 2023

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, तसच रसायने आणि खत मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी आज नवी दिल्लीत "औषधे: दर्जा नियमन आणि अंमलबजावणी" या विषयावर आयोजित दोन दिवसांच्या चिंतन शिबिराचं उद्घाटन केलं.  त्यांच्यासोबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, रसायन आणि खते राज्यमंत्री  भगवंत खुबा, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य), डॉ. व्ही.के. पॉल आणि लोकायुक्त आणि महाराष्ट्राचे उपलोकायुक्त  संजय भाटिया हे उपस्थित होते.  विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य सचिव आणि औषध नियामक, या  विचारमंथनात्मक परिषदेत सहभागी होत आहेत.

आपल्या उद्घाटनपर भाषणात, डॉ. मनसुख मांडविया यांनी या  विचारमंथनात्मक मंचाचं नेमकं लक्ष्य काय आहे ते अधोरेखित केलं. ते म्हणाले, “हे चिंतन शिबिर, औषध आणि आरोग्य क्षेत्रातील सर्व भागधारकांसाठी, सशक्त आणि लवचिक नियामक प्रणाली तयार करण्यासाठी लागणारा एकसंध आणि समन्वयवादी दृष्टिकोन शोधण्याकरता विचारविनिमय करु देणारं एक व्यासपीठ आहे. देशांतर्गत तसच आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडून वापरल्या जाणार्‍या,  देशात उत्पादन झालेल्या औषधांचा दर्जा उत्तम आहे की नाही आणि ही औषधं प्रमाणीत जागतिक उत्पादन प्रक्रियेचं पालन करतात का याची खात्री करण्यासाठी, केंद्र आणि राज्यांमधील विविध संस्था, तसेच औषध यंत्रणेचे सार्वजनिक-खाजगी विभाजन, हे महत्त्वाचे घटक आहेत.''जगाचं औषधालय' हा भारताचा लौकीक अढळ राहील आणि आपण ग्राहकांना उच्च दर्जाची औषध उत्पादनं देऊ शकतो, हे यामुळे निश्चित होईल."

  

दोन दिवसांच्या या सहयोगी विचारमंथनातील चर्चा सफलदायी करण्यासाठी, त्यांनी सहभागींना प्रत्यक्ष  अनुभवातून मिळालेलं त्यांचं ज्ञान आणि मतं मांडण्यासाठी प्रोत्साहित केलं.  “आपल्या समोरच्या आव्हानांना  आपल्या सामुहीक अनुभवाच्या जोरावर एकत्रितपणे तोंड देता येऊ शकतं.  या दोन दिवसांच्या अखेरीस, या  विचारमंथनातून प्रबळ, प्रखर, लवचिक आणि लोकानुकूल यंत्रणा उभारण्यासाठी उपयुक्त ज्ञान मिळेल,” असं मांडविया  म्हणाले.

 

* * *

S.Kane/A.Save/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1902579) Visitor Counter : 232