निती आयोग
नीती (NITI) आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी पदभार स्वीकारला
Posted On:
25 FEB 2023 6:40PM by PIB Mumbai
नीती (NITI) आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1987 च्या तुकडीचे (छत्तीसगड केडर) अधिकारी, सुब्रह्मण्यम यांनी गेल्या तीन दशकांमध्ये, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि जम्मू आणि काश्मीर राज्यांसह जागतिक बँकेमधील कार्यकाळात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात सचिव, जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव, छत्तीसगड सरकारचे प्रधान सचिव आणि पंतप्रधान कार्यालयातील पदांवर काम केले आहे.
भारत सरकारच्या सार्वजनिक धोरण थिंक टँकचा पदभार स्वीकारताना सुब्रह्मण्यम म्हणाले,
"पंतप्रधानांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि जबाबदारीचा मी विनम्रतेने स्वीकार करत आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन."
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1902411)
Visitor Counter : 1221