खाण मंत्रालय

भारतीय खाण विभाग (इंडियन ब्युरो ऑफ माईन्स) 1 मार्च रोजी 75 वा स्थापना दिवस करणार साजरा

Posted On: 25 FEB 2023 12:10PM by PIB Mumbai

 

खाण मंत्रालयांतर्गत भारतीय खाण विभाग (इंडियन ब्युरो ऑफ माइन्स- आयबीएम) 1 मार्च 2023 रोजी आपल्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात 75 वा खनिज दिन आयोजित करणार आहे. केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी तसेच कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे या एक दिवसीय कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. दुपारच्या तांत्रिक सत्राचा एक भाग म्हणून भारताच्या खाण क्षेत्रातील प्रगती आणि अलीकडील उपक्रमांवर प्रकाश टाकणाऱ्या एका विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांच्या हस्ते केले जाईल.

2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी शाश्वत खाण पद्धतींना चालना देण्यासाठी 76 पंचतारांकित खाणींचा सत्कार, विविध खाण कंपन्यांचे सादरीकरण, आयबीएमवरच्या चित्रपटाचे प्रदर्शन, टपाल तिकीट आणि स्मरणिका प्रकाशन ही स्थापना दिनाच्या सोहळ्यातील इतर काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.

राष्ट्रीय खनिज धोरण परिषदेच्या शिफारशींनुसार भारतीय खाण विभागाची स्थापना 1 मार्च 1948 रोजी करण्यात आली. सुरूवातीला पूर्णपणे सल्लागार संस्था म्हणून लहान प्रमाणात कार्यरत असलेला हा विभाग गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या खाण आणि खनिज उद्योगाच्या विविध पैलूंवर काम करणारी एक प्रमुख राष्ट्रीय संस्था म्हणून उदयास आला आहे. वैधानिक तरतुदींची अंमलबजावणी तसेच विविध विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची दुहेरी भूमिका हा विभाग काम करत आहे.

***

M.Jaybhaye/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1902232) Visitor Counter : 145


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu