ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गंगटोक येथे राष्ट्रकुल संसदीय संघटना (सीपीए) भारत प्रदेशच्या 19 व्या वार्षिक विभाग 3 परिषदेचे केले उद्घाटन
Posted On:
24 FEB 2023 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2023
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे राष्ट्रकूल संसदीय संघटना (सीपीए) भारत प्रदेशच्या 19 व्या वार्षिक विभाग III परिषदेचे उद्घाटन केले.

संवाद आणि चर्चा यावर भर देत बिर्ला यांनी चर्चा, संवाद ही लोकशाहीची सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगितले. . लोकांच्या समस्या सोडविणारा मंच म्हणून विधिमंडळ हे विनाअडथळा चर्चेचे केंद्र असले पाहिजे, त्यामुळे लोकांचा लोकशाही संस्थांवरील विश्वास वाढेल आणि आपली लोकशाही मजबूत होईल, असे मत त्यांनी पुढे मांडले.

सायबर दादागिरी आजच्या संदर्भात अत्यंत समर्पक आहे, कारण बऱ्याच लोकांना, विशेषत: किशोरवयीन आणि तरुणांना याचा फटका बसत आहे, असे त्यांनी सांगितले. सर्व नागरिकांना सुरक्षितता आणि सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने कायदे करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी पुढे नमूद केलं.
'अमली पदार्थांचे सेवन आणि त्या विरोधातील उपाय' या विषयावर त्यांनी मतप्रदर्शन केले. अमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुण पिढीवर परिणाम होत आहे. ही समस्या केवळ ईशान्य भागातच नाही तर संपूर्ण देशात आहे. देशातील अंमली पदार्थांच्या गैरवापराची वाढती समस्या संपवण्यासाठी आणि अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी सर्वांनी एकत्रित भावनेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

डिजिटल संसदेचा संदर्भ देत बिर्ला म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विधिमंडळाचे काम जनतेपर्यंत नेले जात आहे; समाज माध्यमे सुसंवाद साधण्याची महत्त्वाची साधने म्हणूनही उदयास आली आहेत. लोकांच्या आशा आणि आकांक्षेनुसार कायदे बनवता यावेत यासाठी कायदा बनवण्याच्या प्रक्रियेत लोकांचा अधिक सहभाग असायला हवा असे आवाहन बिर्ला यांनी केले.

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1902058)
Visitor Counter : 281