आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दक्षिणपूर्व आशियाई क्षेत्राच्या प्रादेशिक महामारी विज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे केले उद्घाटन
Posted On:
23 FEB 2023 8:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2023
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी नुकतेच वाराणसी येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर, सिग्रा येथे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यांच्या उपस्थितीत दक्षिणपूर्व आशिया क्षेत्राच्या प्रादेशिक महामारी विज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम, रोग निरिक्षण आणि आरोग्य आपत्कालीन व्यवस्थापनात काम करणाऱ्या वैद्यकीय तज्ञांमध्ये महामारी विज्ञानाच्या क्षेत्रात कौशल्ये आणि क्षमता निर्माण करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

महामारी विज्ञानाच्या क्षेत्रात सक्षमता निर्माण करण्याच्या गरजेवर भर देत डॉ. पवार यांनी भारताच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रच्या या क्षेत्रातील पाठिंब्याचे कौतुक केले. पंतप्रधानांच्या 'एक भारत-श्रेष्ठ भारत' आणि 'भव्य काशी-दिव्य काशी' हा दृष्टिकोन साकार करण्यासाठी भारतात रोग प्रादुर्भावावर पाळत ठेवण्यासाठी आणि तत्पर प्रतिसादासाठी सार्वजनिक आरोग्य कर्मचारी दल बळकट करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

“कोविड कालावधीतील अनुभव एकत्रित करण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम खूप प्रभावी ठरेल, असेही त्या म्हणाल्या. या परिषदेत होणारी तज्ञांची चर्चा आणि त्यातून समोर येणारे परिणाम धोरण आराखडा तयार करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील.” असे त्यांनी सांगितले.

डॉ. पवार यांनी या कार्यक्रमात वन इंडिया एफईटीपी रोडमॅप दस्तऐवज आणि इबोला व्हायरस रोगावरील सीडी अलर्टचे अनावरण केले.
नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य), डॉ. व्ही.के. पॉल यांनी दुर्लक्षित रोगांच्या (NTDs) निर्मूलनावर भर दिला. “दक्षिण पूर्व आशियातील आपत्कालीन तयारी आणि प्रतिसादासाठी सार्वजनिक आरोग्य कार्यबल विकासामध्ये प्रादेशिक नेतृत्व म्हणून भारताला स्थापित करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी आयोजित ही परिषद कोविड महामारी दरम्यान भारत सरकारच्या धोरणात्मक योजना आणि प्रतिसादांच्या यशस्वी अंमलबजावणीवर देखील लक्ष केंद्रित करेल.", असे डॉ. व्ही.के. पॉल यांनी सांगितले.
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1901861)