आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भारत डिजिटल अभियानाअंतर्गत स्कॅन आणि शेअर सेवेद्वारे 365 रुग्णालयांमध्ये बाह्य रुग्ण विभागात ओपीडी नोंदणीची सुविधा
Posted On:
23 FEB 2023 5:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2023
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने ऑक्टोबर 2022 मध्ये आयुष्मान भारत डिजिटल अभियान या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत स्कॅन आणि शेअर सेवेद्वारे बाह्य रुग्ण विभागासाठी जलद बाह्य रुग्ण नोंदणी सेवेची प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली आहे. ही सेवा सुरु झाल्यापासून 365 रुग्णालयांनी ती स्वीकारली आहे. क्यू आर कोडवर आधारित त्वरित नोंदणी सुविधेअंतर्गत या सुविधेशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयांमधील बाह्य रुग्ण विभागात आतापर्यत 5 लाख रुग्णांना लांबलचक रांगांमधली त्रासदायक प्रतीक्षा टाळणे आणि वेळेची बचत करणे शक्य झाले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये आयुषमान भारत डिजिटल मोहिमे अंतर्गत सुरु असलेल्या जलद आणि विना रांग ओपीडी नोंदणीचे कौतुक केले आहे.
याद्वारे सहभागी रुग्णालये (खाजगी किंवा सरकारी) रुग्ण नोंदणी विभागात विशिष्ट क्यू आर कोड दर्शवतात. रुग्णांना त्यांच्या मोबाईल फोनवरून (एबीएचए ॲप / आरोग्य सेतू ॲप / EkaCare, DRiefcase, बजाज हेल्थ, पे टी एम ॲप यांचा वापर करून) रुग्णालयाचा विशिष्ट क्यू आर कोड स्कॅन करावा लागतो आणि त्यांची ABHA माहिती (नाव, वय, लिंग आणि ABHA क्रमांक इत्यादी तपशील) रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS) सोबत सामायिक करावे लागतात. यामुळे कागद रहित नोंदणी शक्य होऊन रुग्णाला त्वरित टोकन नंबर मिळतो. रुग्णाच्या वेळेची बचत होते आणि आरोग्य सुविधा नोंदणी साठी आवश्यक संसाधनाच्या बाबतीत रुग्णालयाला देखील लाभ होतो. त्यामुळे रुग्णाची आरोग्यविषयक माहिती ABHA (आयुष्मान भारत आरोग्य खात्याशी) जोडली जाते ज्यामुळे रुग्णांना त्यांच्या फोनवरून कधीही कुठेही ही माहिती उपलब्ध होऊ शकते.
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1901766)
Visitor Counter : 199