ऊर्जा मंत्रालय
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, एन टी पी सी ने S&P Platt’s द्वारे जाहीर होणाऱ्या क्रमवारीत जागतिक स्तरावर स्वतंत्र ऊर्जा उत्पादक आणि ऊर्जा व्यापारी म्हणून प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले
Posted On:
23 FEB 2023 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2023
देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी एन टी पी सी लिमिटेडने S&P ग्लोबल कमोडिटी इनसाइट्स टॉप 250 क्रमवारीत ग्लोबल एनर्जी कंपनी रँकिंग्स®-2022 मध्ये जागतिक स्तरावर स्वतंत्र ऊर्जा उत्पादक आणि ऊर्जा व्यापारी म्हणून प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. ही क्रमवारी, मालमत्ता मूल्य, महसूल, नफा आणि गुंतवणुकीवर परतावा या चार प्रमुख परिमाणांवर आधारित आहे.
एन टी पी सी ही केवळ भारतातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी संस्था नसून भारताची आर्थिक वृद्धी आणि विकासातील एक शाश्वत आधारस्तंभ आहे. स्थापित क्षमतेच्या 17% इतका वापर करून , एन टी पी सी सध्या भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण विजेच्या 24% योगदान देते. सर्वाना परवडेल, कार्यक्षम आणि पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत ऊर्जेचा पुरवठा करणे हे एन टी पी सी चे निरंतर ध्येय आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, वायू, पवन, सौर, जल, तरंगते सौर आणि कोळसा अशा विविध स्त्रोतांपासून तयार झालेल्या ऊर्जेचे मिश्रण वापरले जाते.
2032 पर्यंत, एन टी पी सी कंपनीच्या एकूण ऊर्जा निर्मितीपैकी जवळपास 50 टक्के उर्जा निर्मितीसाठी गैर -जीवाश्म इंधन-आधारित क्षमतेचे उद्दिष्ट असून त्यामध्ये 60 गिगावॅट इतकी अक्षय ऊर्जा क्षमता आणि एकूण 130 गिगावॅट ऊर्जा निर्मितीचा समावेश आहे. स्वच्छ आणि हरित स्त्रोतांपासून परिमाण, कार्यक्षमता आणि ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत, एन टी पी सी भारताच्या ऊर्जा संक्रमणाचे नेतृत्व करते. शून्य कार्बन उत्सर्जन उद्दिष्ट गाठण्याच्या उपक्रमात एन टी पी सी, नीती आयोगासोबत एकत्रित कार्य करत आहे.
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1901736)
Visitor Counter : 280