विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताने स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात फ्रान्ससोबत अधिक सहकार्य करण्याचे केले आवाहन आणि इलेक्ट्रिक वाहने तसेच हायड्रोजन उर्जेसंदर्भात हरित संक्रमणाकडे वळण्याच्या नवी दिल्लीच्या योजना अधोरेखित केल्या

Posted On: 23 FEB 2023 8:56AM by PIB Mumbai

भारताने स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात फ्रान्ससोबत अधिक सहकार्य करण्याचे  आवाहन केले आणि इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) तसेच हायड्रोजन उर्जेसंदर्भात हरित संक्रमणाकडे वळण्याच्या नवी दिल्लीच्या योजना अधोरेखित केल्या.

जगातील सर्वात आकर्षक नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांच्या यादीत भारतीय नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र चौथ्या क्रमांकावर असून सौर ऊर्जा हा देशातील अक्षय उर्जेचा सर्वाधिक मुबलक स्त्रोत आहे.

नवी दिल्ली येथील सीएसआयआर –राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत आयोजित स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञानावरील  भारत-फ्रेंच कार्यशाळेचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एस. चंद्रशेखर यांनी उद्घाटन केले. सरकारने 2022 मध्ये  100 गिगावॅट  सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. थारच्या वाळवंटाचा सौर ऊर्जा निर्मितीसाठी वापर करून, भारत 2,100 गिगावॅट पर्यंत सौरऊर्जा निर्माण करेल असा अंदाज आहे असे ते म्हणाले.

राष्ट्रीय जैवइंधन धोरण या भारताच्या आणखी एका महत्वपूर्ण उपक्रमाचाही डॉ चंद्रशेखर यांनी  उल्लेख केला.   2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आणि डिझेलमध्ये 5% बायोडिझेलचे मिश्रण साध्य करण्याचे याचे उद्दीष्ट आहे. कार्बन कॅप्चर आणि स्टोरेज क्षेत्रावर लक्ष केन्द्रित करायला हवे  असे सांगून नीती आयोगाच्या अंदाजानुसार, सैद्धांतिकदृष्ट्या, संपुष्टात आलेले तेल आणि वायू साठे, अ-खनिज कोळसा खारपण जलचर, बेसाल्ट इ. लक्षात घेऊन भारताची एकूण भूवैज्ञानिक CO2 साठवण क्षमता 400-600 जीटी आहे याकडे डॉ. चंद्रशेखर यांनी लक्ष वेधले.

सीएसआयआर – केन्द्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था (सीआयएमएफआर) धनबाद आणि फ्रेंच विज्ञान संशोधन राष्ट्रीय केन्द्र (सीएनआरएस), फ्रान्स यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला. त्याला इंडो-फ्रेंच सेंटर फॉर द प्रमोशन ऑफ अॅडव्हान्स्डने सहकार्य केलं  आहे.


****


Sushama K/Vinayak /CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1901634) Visitor Counter : 180


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu