अर्थ मंत्रालय

23 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान होणाऱ्या अर्थसंकल्प-पश्चात 12 वेबिनारला पंतप्रधान करणार संबोधित


केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये वर्णन केलेल्या "सप्तर्षी" प्राधान्यक्रमांवर आधारित या वेबिनारचे आयोजन विविध मंत्रालये/ विभागांद्वारे केले जाणार

Posted On: 22 FEB 2023 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2023  

अर्थसंकल्पीय घोषणांच्या अंमलबजावणीमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने सर्व भागधारकांना एकत्र आणण्यासाठी पंतप्रधानांनी मांडली या अर्थसंकल्पानंतरच्या वेबिनारची कल्पना.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 फेब्रुवारी ते 11 मार्च 2023 दरम्यान आयोजित अर्थसंकल्प-पश्चात 12 वेबिनारला संबोधित करतील. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये वर्णन केलेल्या "सप्तर्षी" प्राधान्यक्रमांवर आधारित या वेबिनारचे आयोजन विविध मंत्रालये/ विभागांद्वारे केले जात आहे.

पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील सरकारने गेल्या काही वर्षांत अनेक अर्थसंकल्पीय सुधारणा केल्या आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मंत्रालय आणि विभागांना विविध उपक्रमात निधी वापरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी अर्थसंकल्पाची तारीख 1 फेब्रुवारी करण्यात आली होती. अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा आणण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे अर्थसंकल्प-पश्चात वेबिनारची नवीन कल्पना. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रातील तज्ञ आणि व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी आणि विविध क्षेत्रांतील अंमलबजावणी धोरणांवर सहकार्याने कार्य करण्यासाठी पंतप्रधानांनी ही संकल्पना मांडली होती. हे वेबिनार 2021 मध्ये जन भागीदारीच्या भावनेने सुरू करण्यात आले होते. अर्थसंकल्पीय घोषणांच्या प्रभावी, जलद आणि अखंड अंमलबजावणीमध्ये सर्व संबंधित भागधारकांचा सहभाग आणि मालकी यांना प्रोत्साहन देण्यासाठी या वेबिनारची सुरुवात झाली.

या वेबिनारमध्ये, त्रैमासिक उद्दिष्टांसह कृती आराखडे तयार करण्यासाठी विविध मंत्री आणि विभाग तसेच सर्व संबंधित भागधारकांच्या एकत्रित प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले जाईल. यामुळे अपेक्षित परिणाम निश्चित वेळेत साध्य करण्यासाठी अंमलबजावणी सुरळीत आणि पूर्ण रुपात होईल. व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हे वेबिनार दूरदृश्य प्रणाली मार्फत आयोजित केले जात आहेत. या वेबिनारमध्ये संबंधित केंद्रीय मंत्री, सरकारी विभागांचे प्रमुख, भागधारक, नियामक, शैक्षणिक, व्यापार आणि उद्योग संघटना इत्यादी उपस्थित राहतील.

 

1.

Green Growth

23rd February

2.

Agriculture and Cooperatives

24th February

3.

Harnessing Youth power- Skilling and Education

25th February

4.

Reaching the last mile/Leaving No Citizen Behind

27th February

5.

Unleashing the Potential: Ease of living using Technology

28th February

6.

Urban Development with focus on Planning

1st March

7.

Developing Tourism in mission mode

3rd March

8.

Infrastructure and Investment: Improving logistic efficiency with PM Gatishakti National Master Plan

4th March

9.

Health and Medical Research

6th March

10.

Financial Sector

7th March

11.

Women Empowerment

10th March

12.

PM Vishwakarma Kaushal Samman (PM VIKAS)

11th March


S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1901574) Visitor Counter : 172