रेल्वे मंत्रालय

रेल्वे सुरक्षा दलाने आयोजित केलेल्या 18 व्या युआयसी जागतिक सुरक्षा काँग्रेसला सुरवात


जागतिक सुरक्षा कॉंग्रेस, रेल्वे क्षेत्रातील आव्हानांवर उपाययोजना शोधणार

Posted On: 21 FEB 2023 6:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 फेब्रुवारी 2023

 

18व्या जागतिक सुरक्षा काँग्रेसची आज जयपूर इथे सुरवात झाली. ही तीन दिवसीय परिषद पॅरीसची आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटना आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक संजय चंद्र यांच्या स्वागतपर भाषणाने या परिषदेची सुरवात झाली. आपल्या स्वागतपर भाषणात त्यांनी या परिषदेचे महत्व विशद केले आणि “रेल्वे सुरक्षा रणनीती: प्रतिसाद भविष्यासाठीची दूरदृष्टी” या संकल्पनेची प्रासंगिकता यावर विवेचन केले. जागतिक सुरक्षा काँग्रेस हा जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मंच आहे, ज्यावर सदस्य रेल्वे संघटना, युआईसीचे प्रतिनिधी, धोरणकर्ते, राज्य पोलीस दल आणि रेल्वे सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकारी यांना एकत्र आणून सध्या समोर असलेली सुरक्षेची आव्हाने यावर चर्चा करून रेल्वे क्षेत्रात नवनवीन उपाय शोधून काढते.

रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात, सर्व उपस्थितांचे जगातील सर्वत मोठ्या लोकशाही देशात स्वागत केले. जगातील सर्वात मोठ्या रेल्वेजाळ्यापैकी एक मोठे रेल्वेजाळे असलेल्या भारतात ही परिषद होत आहे, असे ते म्हणाले, हा कार्यक्रम म्हणजे आपण एकत्र काम करून भविष्यासाठी एक सुरक्षित रेल्वे क्षेत्र कसे उभे करू शकतो हे दाखवून देण्याची मोठी संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.

रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष ए के लाहोटी यांनी आपल्या आभासी पद्धतीने दिलेल्या भाषणांत, रेल्वे सुरक्षा दले, मालवाहतूक, प्रवासी आणि भारतीय रेल्वेच्या संपत्तीचे रक्षण अतिशय उत्तम रीतीने करत आहे, असे सांगितले. या दलाची परंपरा रेल्वे इतकीच जुनी आहे. अभिनव कल्पना आणि सर्वोत्तम पद्धतींची देवघेव तसेच नवीन भागीदारी निर्माण करण्यासाठी युआयसी जागतिक सुरक्षा कॉंग्रेस एक महत्वाचा मंच ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

युआयसीचे महासंचालक, फ्रांसवा डावेन यांनी मालवाहतूक, प्रवासी वाहतूक आणि रेल्वेची मालमत्ता सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यावर भर दिला. यासाठी काही अभिनव मार्ग शोधून काढणे गरजेचे असून, ज्यातून, आपल्याला भविष्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी एक मजबूत सुरक्षा विषयक व्यवस्था उभारता येईल, असे डावेन म्हणाले.

विधायक- रचनात्मक चर्चा, विचारांची देवाणघेवाण आणि रेल्वे क्षेत्रातील सुरक्षेविषयीच्या सर्वोत्तम पद्धती यांचे आदानप्रदान या परिषदेत होईल, अशी आशा फ्रेंच रेल्वेचे सुरक्षा संचालक आणि सुरक्षा प्लॅटफॉर्मचे उपाध्यक्ष झेवियर रोश यांनी यावेळी व्यक्त केली.

शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी कार्यक्रमाचे बीज भाषण केले. कार्यक्रमाला उपस्थित प्रतिनिधींनी मुलांसाठी अनुकूल धोरणे विकसित करावीत, आणि औद्योगिक क्षेत्रातील सदस्यांनी अधिक जबाबदार आणि नवोन्मेषी भागीदारीसाठी खुले रहावे, असे त्यांनी आवाहन केले. बाल तस्करीसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्या विरोधातल्या लढ्यात, आंतर-सरकारी संस्थांनी सर्वसामान्यपणे केल्या जाणाऱ्या कामा पलीकडे जाऊन, एकत्रितपणे वेगाने काम करणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

या प्रसंगी, आरपीएफ जर्नलच्या विशेष यूआयसी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. आरपीएफ जर्नलच्या विशेष आवृत्तीमध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पोलीस आणि सुरक्षा संस्थांमधील अग्रगण्य व्यावसायिक, नागरी प्रशासनाचा अनेक दशकांचा अनुभव असलेले वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग जगतातील तज्ञांचे लेख आहेत.

आणखी काही अनुकरणीय सादरीकरणे आणि नेट्वर्किंगच्या संधी असलेला हा कार्यक्रम पुढील दोन दिवस चालणार आहे. 

यूआयसी

1922 मध्ये स्थापन झालेल्या यूआयसी (Union International Des Chemins) किंवा आंतरराष्ट्रीय रेल्वे युनियनचे मुख्यालय पॅरिस येथे आहे. 

ही जागतिक पातळीवरील व्यावसायिक संघटना असून, ती  रेल्वे वाहतुकीमधील संशोधन, विकास आणि प्रोत्साहन, यासाठी रेल्वे क्षेत्राचे प्रतिनिधित्व करते. यूआयसी कार्यकारी गट आणि सभेमध्ये सक्रीय भूमिका घेण्यासाठी सदस्यांना आमंत्रित केले जाते. या ठिकाणी प्रादेशिक/जागतिक समस्यांबाबत रेल्वेची भूमिका ठरवली जाते. कार्यकारी गटांमधील सक्रीय  सहभाग, आपली मते मांडण्याची आणि रेल्वे क्षेत्राच्या जागतिक स्तरावरील एकत्रित प्रभावाचा लाभ घेण्याची अनोखी संधी देतो. यूआयसीच्या सुरक्षा व्यासपीठाला कर्मचारी, मालमत्ता आणि आस्थापनांच्या सुरक्षेशी संबंधित बाबींमध्ये जागतिक रेल्वे क्षेत्राच्या वतीने विश्लेषण आणि धोरणात्मक भूमिका विकसित करण्याचे आणि तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)

रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) ही भारतातील रेल्वे सुरक्षा क्षेत्रातील प्रमुख सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. 1957 मध्ये फेडरल फोर्स म्हणून स्थापन करण्यात आलेली आरपीएफ, ही रेल्वेची मालमत्ता, प्रवासी आणि प्रवासी क्षेत्रांच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहे. आरपीएफचे कर्मचारी देशाची सेवा करतात आणि, "सेवा ही संकल्प" - "सेवेचे वचन" या आपल्या घोषवाक्याला मूर्त स्वरुप देत, एक पाऊल पुढे जात आपले कर्तव्य बजावतात. आरपीएफने आता रेल्वे, त्याचे वापरकर्ते आणि त्याच्या भागधारकांच्या सुरक्षेबाबतच्या बदलत्या  गरजा पूर्णपणे ओळखल्या आहेत. आरपीएफ ग्राहकांच्या सर्वसामान्य गरजांना अनुकूल असे नाविन्यपूर्ण उपाय देखील प्रत्यक्ष राबवत आहे. आरपीएफ मध्ये भारताचे सांघिक बळ असण्याचे वेगळेपण असून, यामध्ये महिला अधिकार्यांचा सर्वाधिक सहभाग आहे. आरपीएफ चे महासंचालक संजय चंदर यांनी जुलै 2022 ते जुलै 2024 या काळासाठी आंतरराष्ट्रीय युआयसी सुरक्षा व्यासपीठाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे.

परिषद, नोंदणीचे तपशील आणि उद्दिष्ट याबाबत अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या:  https://uicwsc23.in.

 

* * *

S.Patil/Radhika/Rajshree/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1901149) Visitor Counter : 234


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi