शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत समाविष्ट पायाभूत टप्प्यासाठी शिक्षण-शैक्षणिक साहित्याचे अनावरण


‘जादुई पिटारा ’ - 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठी तयार केलेले खेळावर आधारित शिक्षण-शैक्षणिक साहित्य – धर्मेंद्र प्रधान

Posted On: 20 FEB 2023 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 फेब्रुवारी 2023

 

केंद्रीय शिक्षण मंत्री  धर्मेंद्र प्रधान  यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत समाविष्ट केलेल्या पायाभूत टप्प्यासाठी शिक्षण-शैक्षणिक साहित्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमाला  केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावरील राष्ट्रीय सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. के कस्तुरीरंगन  उपस्थित होते.

आजचा दिवस शैक्षणिक क्षेत्राला अधिक चैतन्यशील बनवणारा ऐतिहासिक दिवस आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठी तयार केलेले खेळावर आधारित शिक्षण-शैक्षणिक साहित्य ‘जादुई पिटारा’ चे अनावरण आज करण्यात आले आहे, असे धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले.

‘जादुई पिटारा'  मध्ये प्लेबुक, खेळणी, कोडी, पोस्टर्स, फ्लॅश कार्ड्स, गोष्टींची  पुस्तके, वर्कशीट यांचा समावेश आहे, त्याचप्रमाणे स्थानिक संस्कृती, सामाजिक संदर्भ आणि भाषा यांचे प्रतिबिंब असून लहान मुलांची जिज्ञासा  जागृत करण्यासाठी आणि मूलभूत टप्प्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण होतील अशाप्रकारे त्याची  रचना केली आहे.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याअंतर्गत विकसित केलेला ‘जादुई पिटारा’ 13 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली. शिक्षण आणि शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध करण्यासह  राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020  मध्ये अंतर्भूत केल्यानुसार  भावी अमृत पिढीसाठी अधिक बाल-केंद्रित, चैतन्यशील आणि आनंददायी वातावरण निर्मितीसाठी ही एक मोठी झेप आहे, असे प्रधान यांनी सांगितले.

राष्ट्रीय थिंक टँक या नात्याने  राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, एनसीईआरटीने ‘जादुई पिटारा’ मधील साहित्य सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आणि  शिशु अवस्थेत घ्यावयाची काळजी आणि विद्यमान शैक्षणिक परिस्थिती याबाबतचे  आपल्या देशातील चित्र  बदलण्यासाठी सर्व राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदांना  हे साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

हे साहित्य  DIKSHA प्लॅटफॉर्म - पोर्टल आणि मोबाइल अॅपवर डिजिटली उपलब्ध करून द्यावे. तसेच सर्व मूलभूत शिक्षण साहित्य मातृभाषेत असावे, असेही मंत्री म्हणाले.

"जादुई पिटारा" ची  ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:-

 • राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा - पायाभूत टप्प्याचे NCF-FS  मुख्य परिवर्तनात्मक पैलू - 'खेळांच्या माध्यमातून  शिका'
 • पायाभूत अवस्था - 3-8 वयोगटातील - खेळांच्या माध्यमातून सर्वोत्तम आणि प्रभावीपणे शिका
 • न्यूरोसायन्सपासून शिक्षणापर्यंत विविध क्षेत्रांतील संशोधन शिक्षणापर्यंत विविध क्षेत्रांतील संशोधन
 • इयत्ता  पहिली  आणि दुसरीला देखील लागू होते (वय 6-8) - मोठे परिवर्तन  - मुले खेळातून शिकतील, मजा करतील आणि मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र यांचे ज्ञान होईल.
 • 5 क्षेत्रांमध्ये शिक्षण आणि विकास:   शारीरिक विकास, सामाजिक-भावनिक आणि नैतिक विकास, संज्ञानात्मक विकास, भाषा आणि साक्षरता विकास, सौंदर्य आणि सांस्कृतिक विकास, याव्यतिरिक्त सकारात्मक शिकण्याच्या सवयीचा देखील  या  टप्प्यात  विकासाचे आणखी एक क्षेत्र म्हणून समावेश करण्यात आला आहे.
 • खेळण्यासाठी अनुकूलता :
 • केवळ पुस्तकेच नव्हे तर शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या संसाधनांची विस्तृत श्रेणी
 • खेळणी, कोडी, कठपुतळीचा खेळ
 • पोस्टर्स, फ्लॅश कार्ड
 • कार्यपत्रिका आणि आकर्षक पुस्तके
 • स्थानिक वातावरण, संदर्भ आणि समुदाय
 • भारतीयांच्या जीवनात रुजलेले स्थानिक संदर्भ
 • जादुई पिटारा मध्ये हे सर्व अंतर्भूत आहे :
 • संसाधनांची श्रेणी
 • विविधता आणि स्थानिक संसाधने सामावून घेण्याची लवचिकता
 • मौ

* * *

N.Chitale/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1900879) Visitor Counter : 217


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi , Odia