दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ट्रायने ‘डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी इमारती किंवा परिसराचे रेटिंग’ संबंधी शिफारशी जारी केल्या
Posted On:
20 FEB 2023 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2023
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने आज "डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी इमारती किंवा परिसराचे रेटिंग" संबंधी शिफारशी जारी केल्या.
गेल्या दशकात डिजिटलायझेशनमधील वेगवान वाढीमुळे अर्थव्यवस्था, नवोन्मेष ,विज्ञान आणि शिक्षणापासून ते आरोग्य, शाश्वतता, शासन आणि जीवनशैली या सर्व बाबींवर परिणाम झाला असून जगात क्रांती झाली आहे. डिजिटल तंत्रज्ञान व्यवसाय मॉडेल, संस्था आणि समाज यात मूलभूत बदल घडवत आहे. मागील काही वर्षांत डिजिटल कनेक्टिव्हिटीची मागणी अनेक पटींनी वाढली आहे आणि कोविड 19 मुळे सगळीकडेच वापरकर्त्यांच्या सर्व क्षेत्रांमधील मागणी वाढत चालली आहे.
यापूर्वी, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आणि सरकारने दूरसंचार कनेक्टिव्हिटीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विविध धोरणात्मक उपाययोजना केल्या आहेत. ट्रायने कनेक्टिव्हिटीच्या दर्जाचे मूल्यांकन करण्यासाठी, कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यातील आव्हाने जाणून घेण्यासाठी आणि पुढील मार्ग सुचवण्यासाठी अनेक अभ्यास केले आहेत. या अभ्यासांच्या आधारे ट्रायने “बहु -मजली निवासी घरांमध्ये चांगल्या दर्जाच्या नेटवर्कचा शोध : दर्जा सुधारण्याच्या मार्गांबाबत नव्याने कल्पना” या विषयावर एक प्रबंध प्रकाशित केला आहे.
याच्या आधारे, ट्रायने डिजिटल कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा व्यापक विकास कार्यांचा भाग असलेली परिसंस्था स्थापन करण्यासाठी एक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी स्वतःहून सल्लामसलत प्रक्रिया हाती घेतली. ट्रायने 7 जुलै 2022 पर्यंत भागधारकांकडून उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सूचना मागवण्यासाठी 25 मार्च 2022 रोजी “ डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी इमारती किंवा परिसराचे रेटिंग ” विषयी कन्सल्टेशन पेपर जारी केला होता .
प्राप्त सूचनांच्या आधारे, खुल्या चर्चेदरम्यान भागधारकांशी चर्चा करून "डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी इमारती किंवा परिसराचे रेटिंग" यावरील ट्रायच्या शिफारसींना अंतिम रूप देण्यात आले. या शिफारशींचा भर डिजिटल कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधांसाठी एक परिसंस्था तयार करण्यासाठी एक व्यवस्था उपलब्ध करून देणे आहे जी, पाणी, वीज किंवा अग्निसुरक्षा प्रणाली यासारख्या अन्य इमारत सेवांप्रमाणेच इमारत विकास योजनेचा एक अविभाज्य भाग असेल. मालमत्ता व्यवस्थापक (मालक किंवा विकासक किंवा बांधकाम व्यावसायिक इ.), सेवा प्रदाता , पायाभूत सुविधा प्रदाते, डीसीआय व्यावसायिक आणि विविध शहरी/स्थानिक संस्थांमधील प्राधिकरणांसह विविध भागधारकांच्या सहकार्याने इमारत विकासासह डीसीआयची सह-रचना आणि निर्मिती केली जाणार आहे. ही व्यवस्था तरुण व्यावसायिकांना डीसीआय व्यावसायिक बनण्यासाठी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी पायाभूत विकासाची रचना , वापर आणि मूल्यांकनात सहभागी होण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करेल.
मालमत्ता व्यवस्थापकांनी (विकासक , बांधकाम व्यावसायिक इ.) इमारतींमध्ये विकसित केलेली डिजिटल कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा सर्व सेवा प्रदात्यांना न्याय्य , पारदर्शक, भेदभावरहित आणि विनाशुल्क आधारावर उपलब्ध असायला हवी यावर ट्रायने भर दिला.
डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी इमारतींच्या रेटिंगसाठी व्यवस्था विकसित करणे हे देखील शिफारशींमध्ये समाविष्ट आहे, ज्यामुळे मालमत्तेचे मूल्य वाढेल. ट्राय इमारतींच्या रेटिंगसाठी स्वतंत्रपणे योग्य नियामक व्यवस्था आणेल ज्यामध्ये रेटिंग प्रमाणपत्राचाही समावेश असेल.
"डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी इमारती किंवा परिसराचे रेटिंग" संबंधी ट्रायच्या शिफारशींची ठळक वैशिष्ट्ये या बातमीत 'परिशिष्ट-1' म्हणून जोडली आहेत.
या शिफारशी ट्रायच्या www.trai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कोणत्याही स्पष्टीकरण/माहितीसाठी,ट्रायचे सल्लागार (QoS-I) तेजपाल सिंह यांना ईमेलवर संपर्क साधता येईल : adv-qos1@trai.gov.in किंवा दूरध्वनी. क्रमांक: +91-11-2323-3602
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1900783)
Visitor Counter : 229