संरक्षण मंत्रालय
भारत-उझबेकिस्तानच्या 'डस्टलिक; या संयुक्त लष्करी सरावाला पिथोरगड (उत्तराखंड) येथे आरंभ
Posted On:
20 FEB 2023 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2023
भारतीय लष्कर आणि उझबेकिस्तान लष्कर यांच्यातील 'डस्टलिक'या चौथ्या संयुक्त लष्करी सरावाला आज पिथोरगड (उत्तराखंड) येथील परदेशी प्रशिक्षण केंद्रात आरंभ झाला. उझबेकिस्तान आणि भारतीय लष्कराचे प्रत्येकी 45 सैनिक या सरावात सहभागी झाले असून दोन्ही लष्करांमधील दृढ संबंधांना प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे. भारतीय लष्कराच्या तुकडीमध्ये गढवाल रायफल्स रेजिमेंटच्या पायदळ तुकडीच्या सैन्याचा समावेश आहे. पहिला सराव नोव्हेंबर 2019 मध्ये उझबेकिस्तान येथे आयोजित करण्यात आला होता.
14 दिवस चालणाऱ्या या संयुक्त सरावात संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार, डोंगराळ आणि निम -शहरी भागात दहशतवादविरोधी संयुक्त कारवायांवर लक्ष केंद्रित केले जाईल आणि यामध्ये क्षेत्रीय प्रशिक्षण सराव , लढाई संदर्भातील चर्चा, व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि प्रमाणीकरण सरावाचा समावेश असेल. यावेळी दोन्ही देशाची लष्करे , संयुक्त मोहिमा आयोजित करण्यासाठी नव्या पिढीची उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शिकत असताना, संभाव्य धोक्यांवर मात करण्यासाठी सामरिक सरावाच्या मालिकेचे संयुक्त प्रशिक्षण देतील ,योजना आखतील आणि अंमलबजावणी करतील. यात संरक्षण दलांमधील परस्पर कार्यक्षमता वाढवण्यावर योग्य भर दिला जात आहे.
या सरावा दरम्यान निर्माण होणारे सौहार्द , सहकार्याची पररस्पर निष्ठेची भावना आणि सद्भावना ,परस्परांच्या संघटना आणि विविध मोहिमा आयोजित करण्याच्या पद्धती समजून घेत दोन्ही लष्करांमधील संबंध आणखी बळकट करण्यात मदत करतील.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1900780)
Visitor Counter : 254