राष्ट्रपती कार्यालय

उत्तरप्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद-2023 च्या समारोप सत्राला राष्ट्रपतींनी केले संबोधित

Posted On: 12 FEB 2023 10:03PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज  म्हणजे 12 फेब्रुवारी 2023 रोजी उत्तरप्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 च्या समारोप सत्राला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की लोकसंख्येचा विचार करता देशातील सर्वात मोठे राज्य असणाऱ्या उत्तरप्रदेशाने अनेक क्षेत्रात आघाडी घेत भारतात अनेक क्षेत्रांमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीत सहयोग दिला आहे.

राजकीय स्थैर्य आणि प्रशासनातील सातत्य हे गुंतवणूकदारांसाठी अत्यंत सहाय्यकारी ठरते ही बाब अधोरेखित करत राष्ट्रपतींनी सध्या  उत्तरप्रदेशमध्ये  स्थिर आणि निर्णयक्षम सरकार आहे असे सांगितले. उत्तरप्रदेश सरकारने दूरदृष्टीने धोरणे आखली  आणि ती राबवली. परिणामी, उत्तरप्रदेश हे नवीन भारतात विकासाचे इंजिन म्हणून आपली भूमिका बजावण्यास उत्तरप्रदेश सक्षम आणि सज्ज आहे असेही त्या म्हणाल्या. या परिषदेतून उत्तरप्रदेशात साधारणतः 35.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, यामुळे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होतील.

उत्तरप्रदेशात सर्वाधिक म्हणजे  साधारणपणे 95 लाख सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग आहेत. ही संख्या देशात सर्वाधिक आहे. देशातील उद्योगांचा कणा असणारे सुक्ष्म ,लघु आणि मध्यम उद्योग

शेतीक्षेत्राखालोखाल सर्वाधिक रोजगारसंधी पुरवतात. भारताच्या आर्थिक विकासात उत्तरप्रदेशाचे सुक्ष्म लघु मध्यम उद्योगक्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

उत्तरप्रदेशात पायाभूत सुविधांचा अतिशय वेगाने विकास होत आहे असे राष्ट्रपतींनी नमूद केले.उत्तरप्रदेशात विकसित झालेल्या संरक्षण कॉरिडॉरमुळे संरक्षण क्षेत्रातील भारताच्या आत्मनिर्भरतेला चालना मिळाली आहे. यामुळे गुंतवणूक येऊन रोजगार निर्मिती होईल असे त्या म्हणाल्या.

विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत असे राष्ट्रपतींनी नमूद केले. नवीकरणीय उर्जेचा विकास, हरित उर्जा मार्ग आणि  राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन  अंतर्गत उर्जा संक्रमण यामुळे  भारताला  नेट झीरो एमिशन

उद्दिष्ट साध्य करता येईल, असे त्या म्हणाल्या. गुंतवणूकीच्या वर्धिष्णू वातावरणात स्वयंरोजगारालाही चालना  मिळते असे राष्ट्रपतींनी सांगितले.

राष्ट्रपतींच्या भाषणासाठी येथे क्लिक करा.

***

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1898601) Visitor Counter : 144


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil