वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
राज्यातले प्रामाणिक शासन आणि सुरक्षित वातावरण यामुळे जागतिक गुंतवणूकदार परिषदेत उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी मोठा प्रतिसाद
Posted On:
12 FEB 2023 6:31PM by PIB Mumbai
उत्तरप्रदेशात लाखो,करोडोंच्या गुंतवणुकीची हमी मिळाली आहे आणि हे शक्य झाले ते राज्यातील प्रामाणिक शासन आणि सुरक्षित वातावरण यामुळे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज लखनौ येथे उत्तरप्रदेश जागतिक गुंतवणुकदार परिषदेला संबोधित करताना केले.
उत्तरप्रदेशातील जागतिक गुंतवणूकदार परिषदेत प्रगतीची भरधाव गती आपल्याला पहावयास मिळत आहे ती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समर्थ नेतृत्वामुळे असे सांगत त्यांनी प्रगतीपथावर वेग घेतलेल्या उत्तरप्रदेशाला आता कोणीही थांबवू शकत नाही असे म्हटले.
गेल्या काही वर्षात उत्तरप्रदेशाने केलेल्या प्रगतीमुळे प्रामाणिक सरकार , लोककल्याणासाठी कामे करणारे सरकार, गैरकृत्यांना थारा न देणारे सरकार आवश्यक तो महसूल सुनिश्चित करत राज्याला नव्या यशोशिखरावर नेऊ शकते हे दिसून आले असेही उद्गार गोयल यांनी काढले.
भारताने गतवर्षी तीन महत्वाचे मुक्त व्यापार करार केले आणि यावर्षीही दोन ते तीन मुक्तव्यापार करार होतील अशी अपेक्षा असल्याचं गोयल यांनी सांगितले. सर्व राज्यांनी निर्यात ही सामाजिक जबाबदारी मानावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते आणि या कामी उत्तरप्रदेशाने पुढाकार घेतला, असे गोयल म्हणाले.
***
N.Chitale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1898548)
Visitor Counter : 198