जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

धारा – नद्या असणाऱ्या शहरांच्या संघटनेच्या सदस्यांची वार्षिक बैठक येत्या 13 ते 14 फेब्रुवारी 2023 दरम्यान पुणे येथे होणार


केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत धारा 2023 च्या उद्घाटनाच्या दिवशी बीज भाषण करणार

Posted On: 12 FEB 2023 5:30PM by PIB Mumbai

 

[कर्टन रेझर] 

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (एनएमसीजी) आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (एनआययुए) यांनी संयुक्तपणे येत्या 13 ते 14 फेब्रुवारी 2023 दरम्यान पुणे येथे धारा अर्थात शहरी नद्यांसाठी समग्र कृती विषयक उपक्रमा अंतर्गत रिव्हर सिटीज अलायन्स म्हणजेच नद्या असणाऱ्या शहरांच्या संघटनेच्या सदस्यांची वार्षिक बैठक आयोजित केली आहे.  

केंद्रीय जलशक्ती मंत्री, गजेंद्र सिंह शेखावत हे कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी बीजभाषण करतील, तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर दुसऱ्या दिवशी समारोपाचे भाषण करतील. धारा 2023च्या माध्यमातून स्थानिक जल संस्थांचे व्यवस्थापन आणि त्यासंबंधीचे उपाय जाणून घेण्यासह विचारमंथन करण्यासाठी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वरिष्ठ अधिकारीभारतातील 95 सदस्यीय नदी शहरांचे ज्येष्ठ नियोजक तसेच मुख्य अभियंता यांना व्यासपीठ उपलब्ध होईल.

भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर शहरी 20(यु20) संकल्पनेअंतर्गत उपक्रमाशी या कार्यक्रमाचा महत्वपूर्ण समन्वय आहे. शहरी जलसुरक्षा हे यु 20च्या अनेक उपक्रमांपैकी एक प्रमुख उद्दिष्ट  आहे. शहरातील एकूण जल सुरक्षा वाढवण्यात निरोगी नद्यांचा मोठा वाटा आहे. धारा 2023 या दोन दिवसीय कार्यक्रमात विविध सत्रांचे आयोजन केले जाणार आहे, यामध्ये पुढील घटकांचा समावेश आहे. शहरी नदी व्यवस्थापनाच्या विविध पैलूंसाठी उपस्थितांना  अनेक अनोख्या आणि नाविन्यपूर्ण उपायांची ओळख करून देण्यासाठी नदी-संबंधित नाविन्यपूर्ण पद्धतींवर राष्ट्रीय केस स्टडीज अर्थात अभ्यास, तलाव आणि तलावांचे पुनरुज्जीवन, वापरलेल्या पाण्याचे वि-केंद्रित व्यवस्थापन, नदीशी संबंधित अर्थव्यवस्थेत वृद्धी, भूजल व्यवस्थापन, पूर व्यवस्थापन आणि डेन्मार्क सारख्या देशांमध्ये अवलंबत असलेल्या नदी-संबंधित नाविन्यपूर्ण पद्धती, इस्रायलमध्ये वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची पद्धत, नेदरलँड्समधील पूरप्रदेश व्यवस्थापन, अमेरिकेमधील नद्यांचे  आरोग्यविषयक निरीक्षण, जपानमधील प्रदूषण नियंत्रण आणि ऑस्ट्रेलियातील जल संवेदनशील शहर आराखडा यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय केस स्टडीजयांचा समावेश आहे.

  • 'धारा' भारताच्या जी20 परिषदेच्या अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर शहरी 20 (यु20) संकल्पनेतील  उपक्रमाशी प्रभावी   समन्वय
  • कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी योगाभ्यास सत्र होईल आणि मुळा-मुठा नदी काठाला भेट दिली जाईल·     
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2022मध्ये पुण्यातील मुळा-मुठा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली.
  • रिव्हर सिटीज अलायन्सची सुरुवात 2021मध्ये 30 शहरांच्या सहभागाने झाली असून सध्या संपूर्ण देशभरातील 95 शहरे यात सहभागी आहेत.श
  • हरी नद्यांच्या  शाश्वत व्यवस्थापनाशी संबंधित माहितीचे आदानप्रदान आणि चर्चा करण्यासाठी एक समर्पित  व्यासपीठ म्हणून रिव्हर सिटीज अलायन्सची स्थापना 2021 मध्ये करण्यात आली.
  • शहरी नदी व्यवस्थापन उपाययोजनांच्या चर्चेसाठी महानगरपालिकांच्या आयुक्तांना समर्पित वेळ देता यावा आणि उपाययोजना समजून घ्याव्यात यासाठी 'धारा २०२३'चे आयोजन केले आहे.
  • यातून होणाऱ्या फलनिष्पत्ती मधून  स्थानिक नद्यांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी शहरे स्वीकारू शकतील अशा तांत्रिक उपायांचे संकलन करणे  समाविष्ट आहे.
  • शहरांमधील नदी व्यवस्थापनासाठी आतापर्यंत न सुटलेल्या समस्या आणि आव्हानांवर धारा प्रकाश टाकेल आणि एन आय यु ए आणि भागीदारांना प्रभावी कार्य योजना तयार करण्यात मदत करेल.

या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी योगाभ्यास सत्र होईल आणि मुळा मुठा नदी काठाला भेट दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2022 मध्ये पुण्यातील मुळा मुठा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत या प्रकल्पामध्ये एकूण 396 MLD क्षमतेच्या 990.26 कोटी रुपये खर्चाच्या 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा अंतर्भाव आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या इतर मान्यवरांमध्ये  महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवएनएमसीजीचे महासंचालक, जी. अशोक कुमार, महाराष्ट्र सरकारच्या  नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या  अतिरिक्त सचिव श्रीमती  डी. थारा, यांचा समावेश आहे.

सदस्य शहरांच्या महापालिका आयुक्तांना  सखोल चर्चा करता यावी  आणि शहरी नदी व्यवस्थापनासाठी संभाव्य उपाय शोधण्यासाठी धारा 2023 चे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमात  आर सी ए (आयुक्त/अतिरिक्त आयुक्त), केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, एनआययुए-एनएमसीजीचे प्रतिनिधी, नागरिक, विचारवंत (बिगर-सरकारी संस्था आणि वैचारिक नेते), विद्यार्थी आणि युवा नेते, राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व्यक्ती, अंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व्यक्ती, स्थानिक सरकारी संस्था, खाजगी क्षेत्रातील भागधारक, निधी देणाऱ्या संस्था आणि माध्यम प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या सत्रात निवडक राज्यांच्या (उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू) प्रधान सचिवांसह (शहरी विकास) शहरी नदी व्यवस्थापनाशी संबंधित अजेंडा मजबूत करण्यावर आणि प्राधान्यक्रम निश्चित करण्यावर चर्चा केली जाईल. याशिवाय या कार्यक्रमात आर सी ए सदस्यांच्या आयुक्तांना त्यांच्या शहरात नद्या आणि जलस्रोतांशी संबंधित हाती घेतलेल्या  उद्बोधक कार्याचे सादरीकरण करता येणार आहे.

नदी-संबंधित प्रकल्पासाठी निधी या विषयावरील  सत्रात नदी-संबंधित प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेल्या विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय निधीची रूपरेषा मांडली जाईल. या सत्राच्या वक्त्यांमध्ये जागतिक बँक, एजन्स फ्रँकाइस डे डेव्हलपमेंट (एएफडी), डेन्मार्क दूतावास, आंतरराष्ट्रीय विकास विभाग (DFID), KfW विकास बँक, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (JICA), आणि खाजगी उपक्रम(सीएसआर सामाजिक उत्तरदायित्व) यांचा समावेश असेल.

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सत्र नदी व्यवस्थापनासाठी वापरता येण्याजोग्या अभिनव पद्धतींच्या प्रदर्शनाच्या स्वरुपात सदर केले जाईल. हे  तंत्रज्ञानडेटाबेस आणि देखरेख, नदीकाठचा विकास, पर्यावरण स्नेही बांधकाम साहित्य, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन आणि अॅप्स आणि माहित तंत्रज्ञानाशी -संबंधित नवकल्पना यांच्याशी संबंधित आहेत. याशिवाय विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना शहरी नद्यांच्या व्यवस्थापनासाठी त्यांच्या कल्पना मांडण्याची संधी देण्यासाठी युथ फॉर रिव्हर्सअर्थात नद्यांसाठी युवाहे  तरुणांसोबतचे  एक सत्रही होणार आहे.

'धारा 2023'च्या  संभाव्य फलनिष्पत्तीमधून आरसीए सदस्यांना त्यांच्या शहरातील शहरी नदी व्यवस्थापन क्षेत्रात प्रगतीशील कृती करायला प्रेरणा मिळेल. शहरांमधील नदी व्यवस्थापनात आतापर्यंत न सुटलेल्या समस्या आणि आव्हानांवर धारा प्रकाश टाकेल आणि एनआययुए आणि भागीदारांना प्रभावी कार्य योजना तयार करण्यात मदत करेल. तसेच याद्वारे शहरांमधील स्थानिक नद्यांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी शहरे स्वीकारू शकतील अशा तांत्रिक उपायांचे संकलन करणे सुलभ होईल.  

'रिव्हर सिटीज अलायन्स'ची सुरुवात 2021मध्ये 30 शहरांच्या सहभागाने झाली असून सध्या संपूर्ण देशभरातील 95 शहरे यात सहभागी आहेत. शहरी नद्यांच्या शाश्वत व्यवस्थापनाशी संबंधित कल्पना, माहितीचे आदानप्रदान आणि चर्चा करण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ म्हणून  गजेंद्र सिंग शेखावत यांनी नोव्हेंबर 2021मध्ये 'रिव्हर सिटीज अलायन्स'ची स्थापना  केली. 'रिव्हर सिटीज अलायन्स' ही अशाप्रकारची जगातील एकमेव संघटना असून याद्वारे जलशक्ती मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय या दोन मंत्रालयांच्या यशस्वी  भागीदारीचे ते प्रतीक आहे. नेटवर्किंग-संपर्क, क्षमता निर्माण आणि तांत्रिक समर्थन या तीन व्यापक संकल्पनांवर ही संघटना भर देते.

***

S.Pophale/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1898532) Visitor Counter : 294