अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2022-23 मधे प्रत्यक्ष कर संकलन 15.67 लाख कोटी रुपये - 10.02.2023 पर्यंत गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण संकलनापेक्षा 24.09 टक्के जास्त


निव्वळ परताव्याचे प्रत्यक्ष कर संकलन, 12.98 लाख कोटी रुपये - गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 18.40 टक्के जास्त

Posted On: 11 FEB 2023 12:34PM by PIB Mumbai

 

प्रत्यक्ष कर संकलनाची 10 फेब्रुवारी 2023 पर्यंतची तात्पुरती आकडेवारी स्थिर वाढ नोंदवत आहे. 10 फेब्रुवारी 2023 पर्यंतचे प्रत्यक्ष कर संकलन हे दर्शवते की एकूण संकलन 15.67 लाख कोटी रुपये आहे. ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण संकलनापेक्षा 24.09 टक्के जास्त आहे. निव्वळ परताव्याचे प्रत्यक्ष कर संकलन, 12.98 लाख कोटी रुपये आहे. ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 18.40 टक्के जास्त आहे.

हे संकलन आर्थिक वर्ष 2022-23 च्या प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकाच्या 91.39% आहे. आणि आर्थिक वर्ष 2022-23 च्या प्रत्यक्ष करांच्या सुधारित अंदाजांपैकी 78.65% आहे.

एकूण महसूल संकलनाच्या बाबतीत कॉर्पोरेट प्राप्तीकर (सीआयटी) आणि वैयक्तिक प्राप्तीकराच्या (पीआयटी) दर वाढीचा विचार करता, सीआयटी वाढीचा दर 19.33% आहे तर पीआयटीचा (एसआयटीसह) 29.63% आहेपरताव्याच्या समायोजनानंतर, सीआयटी संकलनात 15.84 टक्के निव्वळ वाढ आहे आणि पीआयटी संकलनात ती 21.93 टक्के (केवळ पीआयटी)/21.23% (एसटीटी सह पीआयटी) आहे.

परताव्यापोटी 1 एप्रिल 2022 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत 2.69 लाख कोटी जारी करण्यात आले आहेत. ते मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्याच्या तुलनेत 61.58% जास्त आहेत.

***

S.Tupe/V.Ghode/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1898307) Visitor Counter : 217


Read this release in: Hindi , Telugu , Tamil , English , Urdu