खाण मंत्रालय
खाण इंदाबा आंतरराष्ट्रीय परिषदेत खाण, कोळसा आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व
Posted On:
10 FEB 2023 12:47PM by PIB Mumbai
दरवर्षी दक्षिण आफ्रिकेत केप टाउन येथे आयोजित केली जाणारी मायनिंग इंदाबा ही खाण परिषद जगातील सर्वात लोकप्रिय खाण परिषदांपैकी एक आहे. यंदा खाण, कोळसा आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे शिष्टमंडळ या परिषदेत सहभागी झाले. मध्य प्रदेश सरकारचे खाण आणि कामगार विभाग मंत्री ब्रिजेंद्र प्रताप सिंह यांनीही या परिषदेला उपस्थित होते. शिष्टमंडळात खाण, कोळसा, पोलाद आणि परराष्ट्र मंत्रालयांचे अधिकारी तसेच जीएसआय, एएमडी, एचसीएल, नाल्को, एनएमडीसी, सीआयएल, सेल, मॉईल, एमईसीएल, एनटीपीसी, ओएमसी सारख्या कंपन्या/ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
भारतीय खाण आणि खनिज क्षेत्राची ताकद दर्शविणारे एक आकर्षक व्यासपीठ पॅव्हेलियन परिषदेच्या ठिकाणी उभारण्यात आले होते. “भारतातील गुंतवणुकीच्या संधी” या संकल्पनेसह परिषदेचे उद्घाटन 6 फेब्रुवारी 2023 रोजी रावसाहेब पाटील दानवे आणि ब्रिजेंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते झाले. पॅव्हेलियनचे डिझाइन आणि त्यातील सामग्री यांच्या उच्च दर्जाबद्दल आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी कौतुक केले. सरकारने हाती घेतलेले उपक्रम आणि सुधारणांविषयी खाण मंत्रालयाचे एक माहितीपत्रक आणि विविध राज्य सरकारांच्या आगामी कृती करण्यायोग्य खनिज ब्लॉक्सची पुस्तिका यावेळी वितरित करण्यात आली.
परिषदेच्या निमित्ताने सौदी अरेबिया, नायजेरिया, काँगो आणि झांबिया यांच्यासोबत द्विपक्षीय मंत्रीस्तरीय बैठका झाल्या. विविध देश आणि संघटनांचे प्रतिनिधी तसेच भारतीय प्रतिनिधी यांच्यातही चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. दक्षिण आफ्रिकेतील भारताचे उच्चायुक्त आणि केपटाऊन येथील भारताचे वाणिज्य दूत या कार्यक्रमाला उपस्थित होते. केपटाऊनमध्ये भारत सरकारच्या यशस्वी सहभागाचे त्यांनी स्वागत केले. खाण आणि खनिज क्षेत्रातील सरकारच्या उपक्रमांबद्दल दानवे यांनी माहिती दिली आणि त्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन दानवे यांनी 8 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना संबोधित करताना केले.
***
S.Bedekar/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897958)
Visitor Counter : 218