अणुऊर्जा विभाग
देशात 22 अणुऊर्जा भट्ट्या कार्यरत असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत, 2017 मध्ये एक लाख पाच हजार कोटी रुपये खर्चाच्या 10 स्वदेशी अणुभट्ट्यांना मंत्रिमंडळाने पहिल्यांदाच मंजुरी दिल्याची जितेंद्र सिंह यांची माहिती
Posted On:
09 FEB 2023 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2023
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावर 2014 नंतर भारताच्या अणुऊर्जा क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. उपलब्ध आकडेवारी नुसार, वर्ष 2013-14 मधील वार्षिक अणुऊर्जा निर्मिती 35,333 दशलक्ष युनिट्स इतकी होती. वर्ष 2021-22 मधील ताज्या आकडेवारीनुसार, देशात 47,112 दशलक्ष युनिट्स इतकी अणुउर्जा निर्मिती झाली असून, गेल्या साडे आठ वर्षांच्या अल्प कालावधीत यामध्ये 30 ते 40 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), भू-विज्ञान (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत अणुऊर्जा भट्ट्यांवरील चर्चेदरम्यान ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील अणुऊर्जा निर्मितीच्या वाढीला पूरक ठरतील असे अनेक अनोखे पथदर्शक निर्णय घेतल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. उदाहरणार्थ, ते म्हणाले, सध्याचं सरकार येण्यापूर्वी देशात फक्त 22 अणुभट्ट्या होत्या, तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने 2017 मध्ये एकूण 1,05,000 कोटी रुपये खर्चाच्या आणि एकूण 7,000 मेगा वॅट क्षमतेच्या तब्बल 11 स्वदेशी उच्च दाबाच्या हेवी वॉटर अणुभट्ट्यांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मंजुरी दिली.
दुसर्या एका प्रश्नाच्या उत्तरात, डॉ जितेंद्र सिंग यांनी अभिमानाने नमूद केले की युरेनियम-233 चा वापर वापरून, "भवनी" हा जगातील पहिला थोरियम आधारित अणु प्रकल्प तामिळनाडूतील कल्पक्कम येथे उभारला जात आहे. संपूर्णपणे स्वदेशी असलेला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असल्याचे ते म्हणाले. "कामिनी" हा थोरियम आधारित प्रायोगिक प्रकल्प कल्पक्कममध्ये यापूर्वीच उभारण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897836)
Visitor Counter : 301