रेल्वे मंत्रालय

रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) जानेवारी 2023 मध्ये ऑपरेशन "नार्कोस" आणि ऑपरेशन "आहट" (AAHT) अंतर्गत एक महिनाभर राबवली देशव्यापी मोहीम

Posted On: 08 FEB 2023 4:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2023

रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), हे रेल्वेची मालमत्ता, प्रवासी क्षेत्र, प्रवासी आणि त्यांच्याशी संबंधित बाबींच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहे. या आदेशा व्यतिरिक्त, राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी आरपीएफ कडे इतर जबाबदाऱ्या देखील सोपवण्यात आल्या आहेत.

ऑपरेशन “आहट" अंतर्गत मानवी तस्करीला बळी पडलेल्यांना ओळखून, त्यांची सुटका करण्यासाठी आरपीएफ, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या इतर संस्था आणि  भागधारकांच्या सहयोगाने काम करत आहे.

यावर लक्ष केंद्रित करत, आरपीएफ ने एक महिनाभर देशव्यापी अभियान राबवले. या अंतर्गत,  रेल्वेच्या जाळ्या द्वारे अंमली पदार्थांची आणि मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांना आळा घालण्यासाठी, ऑपरेशन “नार्कोस” आणि ऑपरेशन “आहट " राबवणे हा यामागचा हेतू होता.  

या अभियानात आरपीएफ ने 4.7 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ जप्त केले. तसेच अंमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) कायद्या अंतर्गत 83 व्यापारी/तस्करांना ताब्यात घेतले. या कारवाईत तस्करांच्या तावडीतून 35 मुले आणि 27 मुलींची सुटका करण्यातही आरपीएफ ने यश मिळवले, आणि मानवी तस्करी करणाऱ्या 19 जणांना त्यांच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी संबंधित कायदा अंमलबजावणी संस्थेकडे सोपविले.

रेल्वेमध्ये कंत्राटी कामावर नियुक्त असलेल्या सर्व व्यक्तींची ओळखपत्रे आणि त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत संबंधित पोलिसांकडून पडताळणी केली जावी आणि केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमी  नसलेल्या व्यक्तींनाच रेल्वे यंत्रणेत काम करायची परवानगी दिली जावी यासाठी आरपीएफ मिशन मोडमध्ये काम करत आहे. या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून उपाययोजना करण्यात आली, आणि कंत्राटदारांना त्यांच्या कर्मचार्‍यांच्या पोलिस पडताळणीच्या अटीचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.

 

S.Kane/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1897334) Visitor Counter : 168