राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

जबाबदार सायबर सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी क्वाड सहकार्य

Posted On: 08 FEB 2023 3:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी  2023

क्वाड राष्ट्रांमध्ये सायबर सुरक्षेमध्‍ये  सुधारणा व्हावी, यासाठी  सार्वजनिक मोहीम सुरू करण्‍यात येत  आहे.  ‘क्वाड नेशन्स: क्वाड सायबर चॅलेंज’ अशी ही मोहीम आहे. यामध्‍ये सहभागी  होण्यासाठी भारत- प्रशांत महासागर आणि त्याही पलिकडच्या इंटरनेट वापरकर्त्यांना आमंत्रित करण्‍यात आले आहे. (https://www.cyberchallenge.tech/) या संकेतस्थळाच्या माध्यमातून इंटरनेट वापरकर्त्यांनी मोहिमेत सहभागी व्हावे आणि  सुरक्षित त्याचबरोबर  जबाबदार सायबर सवयींचा अवलंब  करण्याविषयी प्रतिज्ञा घ्‍यावी. व्यक्ती आणि समुदायांची सायबर सुरक्षा जागरुकता आणि कृती मजबूत करण्यासाठी तसेच अर्थव्यवस्था आणि वापरकर्त्यांना सर्वत्र लाभ देण्यासाठी अधिक सुरक्षित आणि लवचिक सायबर परिसंस्थेला चालना देण्यासाठी सुरू असलेले  क्वाड राष्‍ट्र समुहाच्या  प्रयत्नांचे  प्रतिबिंब म्हणजे हे  आवाहन आहे.

जगभरातील इंटरनेट-वापरकर्ते सायबर गुन्ह्यांचे आणि इतर वाईट हेतूने केलेल्या  सायबर धोक्यांचे लक्ष्य होत आहेत. यामुळे  दरवर्षी ट्रिलियन डॉलर्स खर्च होऊ शकतात आणि संवेदनशील, वैयक्तिक डेटामध्‍ये गडबड  केली जावू शकते. अनेक  सायबर हल्ले यशस्वी झाले आहेत; त्यापासून साध्या प्रतिबंधात्मक उपायांनी रक्षण करणे शक्य आहे. मात्र यासाठी  इंटरनेट वापरकर्ते आणि सायबर सुरक्षा सेवा प्रदाते एकत्रितपणे  सायबर सुरक्षामध्‍ये  लक्षणीय सुधारण्यासाठी लहान, लहान  पावले उचलू शकतात. यामध्ये नियमितपणे सुरक्षा साधने अद्ययावत करून ती  स्थापित करावीत , बहु-घटक प्रमाणीकरणाद्वारे वर्धित ओळख तपासण्याचे काम अधिक सक्षम केले जावे, मजबूत आणि नियमितपणे पासवर्ड म्हणजेच सांकेतिक वाक्यांश बदलणे आणि ‘फिशिंग’  सारखे सामान्य ऑनलाइन घोटाळे कसे ओळखायचे हे जाणून घेतले पाहिजे.  

या आव्हानांमध्‍ये  मूलभूत सायबरसुरक्षेविषयी  माहिती आणि प्रशिक्षण यासारखी साधने   प्रदान करण्‍यात येतात .  सर्व वापरकर्त्यांसाठी- कॉर्पोरेशन्सपासून ते शिक्षण संस्थांपर्यंत, लहान व्यवसायांपर्यंत  आणि  शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत, सर्वांना  या मोहिमेत सहभागी होता येणार आहे.  10 एप्रिलला संपणा-या  आठवड्यापर्यंत या मोहिमेचा  कार्यक्रम सुरू राहणार आहे.  ऑनलाइन आणि स्मार्ट साधने वापरताना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांमध्ये प्रत्येकाला प्रवेश मिळावा, यासाठी क्वाड भागीदार देश काम करत आहेत.

भारतामध्‍ये  ही मोहीम राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयासह राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक कार्यालयाद्वारे समन्वयीत  केली  जात आहे.

S.Kane/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1897323) Visitor Counter : 80


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu