रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची कतारचे परिवहन मंत्री जसिम बिन सैफ अल सुलैती यांनी घेतली भेट
Posted On:
07 FEB 2023 8:10PM by PIB Mumbai
केंद्रीय रस्ते,वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची आज नवी दिल्ली येथे कतारचे परिवहन मंत्री जसिम बिन सैफ अल सुलैती यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
या बैठकीमध्ये शाश्वत विकासासाठी पायाभूत वाहतूक सुविधांविषयी विचार आणि मतांचे आदानप्रदान करण्यात आले. शाश्वत पर्यायी स्वच्छ आणि हरित इंधन, विजेवर चालणारी वाहने आणि प्रवासी तसेच मालवाहू वाहतुकीसाठी नाविन्यपूर्ण वाहतूक तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये क्षमता वृद्धी करणे, त्याचबरोबर तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीमुळे वाहतूक आणि लॉजिस्टिक मधल्या समकालीन आव्हानांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी कतारबरोबर भारताच्या निरंतर भागीदारीचा आणि यापुढेही सहयोग मजबूत करण्याचा मार्ग प्रशस्त झाला.
***
N.Chitale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897164)
Visitor Counter : 129