आयुष मंत्रालय
औषधी वनस्पती आणि उत्कृष्ट कृषी पद्धतीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता सरकारने उचललेली पावले
Posted On:
07 FEB 2023 3:48PM by PIB Mumbai
आयुष मंत्रालयाच्या एनएमपीबी अर्थात राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने, औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास आणि शाश्वत व्यवस्थापन यासाठी केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत, माहिती शिक्षण आणि संवाद याद्वारे क्षमता वृद्धी कार्यक्रम,जागृतीपर कार्यक्रम यासाठी विविध संस्था आणि संघटना यांना प्रकल्प मोड वर वित्तीय पाठबळ पुरवले आहे. एनएमपीबीने माहिती शिक्षण आणि संवाद विषयक विविध कार्यक्रमांसाठी 126 प्रकल्पांना सहाय्य दिले आहे. औषधी वनस्पतींचे संवर्धन, लागवड आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि विपणन यासह विविध पैलूंवर शेतकऱ्यांसह संबंधितांना याबाबत प्रबोधन करणारे हे कार्यक्रम होते. यासाठी आर्थिक वर्ष 2017-18 ते 2021-22 या कालावधीसाठी 3079.116 लाख रुपयांची एकूण तरतूद होती.
CSIR-CIMAP अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संचालनालय आणि केंद्रीय औषधी आणि सुगंधीत वनस्पती संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुधारित कृषी तंत्रज्ञान, उच्च उत्पादन देणारे वाण आणि औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करून देशाच्या विविध भागांमध्ये औषधी आणि सुगंधी वनस्पती-आधारित क्रियाकलापांना प्रोत्साहन देत आहे. औषधी आणि सुगंधी वनस्पतींचे उत्पादन, प्राथमिक प्रक्रिया आणि विपणन या बाबींवर विविध प्रकारचे जागरूकता कार्यक्रम आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवून शेतकरी आणि उद्योजकांमध्ये तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. गेल्या तीन वर्षात म्हणजेच वर्ष 2019-20, 2020-21, 2021-22आणि चालू वर्ष 2022-23 मध्ये एकूण 6 किसान मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. ज्यात सुमारे 17,000 शेतकरी, उद्योजक आणि उद्योग प्रतिनिधी सहभागी झाले. याच कालावधीत संस्थेने देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 2 ते 3 दिवसांचे 48 कौशल्य-सह-तंत्रज्ञान उन्नत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत ज्यामध्ये एकूण 3004 शेतकरी/उद्योजकांना चांगल्या कृषी पद्धतींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या औषधी आणि सुगंधी वनस्पती . याशिवाय एकूण 163 एकदिवसीय जनजागृती आणि त्यांच्या पर्यंत पोहचण्याचे कार्यक्रम घेण्यात आले, ज्यामध्ये 10,791 शेतकऱ्यांना औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड आणि प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. CSIR-NBRI कौशल्य विकास कार्यक्रमासह कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध बाबींवर शेतकरी आणि उद्योजकांना विविध प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करते.
गुजरातच्या आणंद इथल्या औषधी आणि सुगंधी वनस्पती संशोधन संचालनालयाच्या फलोत्पादन विज्ञान विभागाच्या अंतर्गत खालील कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.
शास्त्रज्ञ – शेतकरी संवाद सभा, शेतकरी मेळा, प्रदर्शने, सल्लागार सेवा इत्यादी.
• विविध आयसीटी प्लॅटफॉर्म अर्थात मोबाईल अॅप्स, सोशल मीडियाद्वारे शेतकरी समुदायापर्यंत पोहोचणं.
• इंग्रजी, हिंदी आणि इतर स्थानिक भाषांमधील विस्तार पत्रिका, विस्तारीच बातम्या, शेतकरी सल्लागार सेवा, लागवड साहित्याची उपलब्धता.
• विविध प्रशिक्षण कार्यक्रम, प्रदर्शने, मेळावे आणि शेतकऱ्यांच्या एक्स्पोजर भेटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाते.
• संचालनालय सक्रियपणे मेरा गाव मेरा गौरव, शेतकरी प्रथम, हा केंद्र सरकारचा प्रमुख कार्यक्रम आयोजित करते. या उपक्रमांतर्गत संचालनालयाने गावे दत्तक घेतली आहेत. या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते. शास्त्रज्ञांच्या चमुद्वारे नियमित संवादाचे आयोजन केले जाते.
• अद्ययावत वाणांची लागवड साहित्य संचालनालयाकडून शेतकऱ्यांना पेमेंट आधारावर वितरित केले जाते.
• संचालनालय शेतकरी, व्यापार्यांना त्यांच्या भेटी/दुरध्वनी संवाद इत्यादी दरम्यान नियमित मार्गदर्शन प्रदान करते.
आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
N.Chitale/S.Mohite/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897157)
Visitor Counter : 587