पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या इंडिया एनर्जी वीक अर्थात भारत उर्जा सप्ताह 2023 चे उद्घाटन करणार

Posted On: 05 FEB 2023 8:52PM by PIB Mumbai

 

कर्नाटकातील बंगळुरू इथे उद्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी, इंडिया एनर्जी वीक अर्थात भारत उर्जा सप्ताह 2023 चे उद्घाटन करणार आहेत. 6 - 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजित भारत उर्जा सप्ताहाचं उद्दीष्ट ऊर्जा स्थित्यंतर म्हणजेच पारंपरिक उर्जेच्या वापरापासून अपारंपारीक उर्जा वापराकडे होत जाणाऱ्या बदलाचं जागतिक शक्तीपीठ म्हणून भारताच्या वाढत्या नैपुण्याचं प्रदर्शन करणं हे आहे. या उपक्रमामुळे पारंपरीक आणि अपारंपरीक ऊर्जा उद्योग, सरकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती  एकत्र येतील आणि  जबाबदार ऊर्जा स्थित्यंतरामुळे निर्माण होणारी  आव्हानं आणि संधी यावर चर्चा करतील.  कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान जागतिक तेल आणि वायू उद्योगक्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत गोलमेज संवादात सहभागी होतील.  हरीत ऊर्जेच्या क्षेत्रातही ते अनेक उपक्रम सुरू करणार आहेत.

 

E20 इंधन:

इथेनॉल मिश्रण प्रक्रियेच्या कृती आराखड्यानुसार, पंतप्रधान 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील तेल विपणन कंपन्यांच्या 84 पेट्रोल पंपांवर,  E20 या इंधनविक्रीची  सुरुवात करतील.  E20 हे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल असं मिश्रण असलेलं इंधन आहे.

 

ग्रीन मोबिलिटी रॅली-

ग्रीन मोबिलिटी रॅलीलाही पंतप्रधान उद्या  हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करतील.  या फेरीमध्ये हरित ऊर्जा स्रोतांवर  चालणारी वाहनं सहभागी होतील. या उपक्रमामुळे वाहनधारकांमध्ये  हरीत इंधनाच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी मदत होईल.

 

इंडियन ऑइलचा अनबॉटलम्हणजेच ग्राहकोपयोगी सुविधा पुरवठा उपक्रम

इंडियन ऑइलच्या अनबॉटलउपक्रमा अंतर्गत पंतप्रधान गणवेशाचं लोकार्पण करतील.  एकदा  वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर कायमस्वरुपी बंद करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पानुसार, पेट्रोल पंपावर इंधन विक्री करणारे कर्मचारी  आणि एलपीजी सिलिंडर घरपोच करणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी पुनर्वापर केलेले पॉलिस्टर (rPET) आणि सुती कापडापासून  बनवलेले गणवेश पुरवण्याचा निर्णय इंडियन ऑइलनं घेतला आहे.

 

इनडोअर सोलर कुकिंग सिस्टमचे ट्विन-कूकटॉप मॉडेल

इंडियन ऑइलनं विकसीत केलेल्या, बंदीस्त ठिकाणी सौरऊर्जेवर चालणाऱ्या  स्वयंपाक सुविधेच्या ट्विन-कूकटॉप मॉडेल म्हणजेच दुहेरी शेगडीचं देखील, पंतप्रधान, लोकार्पण करतील आणि तिच्या व्यावसायिक उपयोगाचं उद्घाटन करतील.  इंडियन ऑइलनं यापूर्वी एक नाविन्यपूर्ण अशी एकेरी शेगडी  असलेली इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीम विकसित करुन तिचा स्वामित्व हक्क (पेटंट) मिळवला होता. या एकेरी शेगडीला  मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे, या ट्विन-कूकटॉप इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीमची रचना, वापरकर्त्यांना अधिक लवचिकता आणि सुलभता प्रदान करुन देणारी आहे.

***

S.Kane/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896487) Visitor Counter : 164