कोळसा मंत्रालय

महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडने विहंगम ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे सादर केली आहेत

Posted On: 03 FEB 2023 5:38PM by PIB Mumbai

 

कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत प्रमुख केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडने (MCL), ड्रोन आणि ग्राउंड कंट्रोल सिस्टमसह वेब-आधारित पोर्टल VIHANGAM चा शुभारंभ करून कोळसा खाण क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराची सुरुवात केली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून अधिकृत व्यक्तीला खाणीजवळील समर्पित 40 Mbps इंटरनेट लीज लाइनद्वारे खाणीतील  रिअल टाईम ड्रोन व्हिडिओ बघता येतो. एका नियंत्रण स्थानक अर्थात कंट्रोल स्टेशन वरून ड्रोन चालवले जाते. तसेच ही यंत्रणा पोर्टलद्वारे कोठूनही चालवता येते. हा पथदर्शी प्रकल्प सध्या तालचेर कोलफिल्ड्सच्या भुवनेश्वरी आणि लिंगराज ओपनकास्ट खाणींमध्ये कार्यरत आहे.

खाण प्रक्रियेचे  डिजिटलायझेशन तसेच पर्यावरण निरीक्षण, क्षेत्राचे मोजमाप आणि फोटोग्रामेट्रिक मॅपिंगसाठी महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून कोळशाचे विक्रमी उत्पादन घेण्यासोबतच एम सी एल, सुरक्षा मानके आणखी वाढवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा अवलंब करत आहे. एम सी एल ने अलीकडेच आपल्या कोळसा भांडारामध्ये रोबोटिक नोजल वॉटर स्प्रेअर कार्यान्वित केले आहे. अतिशय कठीण आणि धोकादायक कामगिरी  पार पाडण्यासाठी कोळसा कंपन्या रोबोट-सहाय्यित अग्निशामक आणि धूळ दमन करण्याच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात.

ही उपकरणे पाण्याच्या अतिसूक्ष्म तुषारांच्या स्वरूपात 70 मीटरपर्यंत फवारा करू  शकतात.  या नोजलला स्विव्हल नोजल असेही म्हणतात आणि ते 28 किलोलिटर क्षमतेच्या पाण्याच्या टँकरवर लावले जाते. ओडिशातील सुंदरगड, झारसुगुडा आणि अंगुल जिल्ह्यांमध्ये कोळसा खाणकामात कार्यरत असलेली, महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (एम.सी.एल.) ही कंपनी भारतातील एकूण उत्पादित कोळशाच्या उत्पादनात 20%पेक्षा जास्त योगदान देते.

***

S.Patil/B.Sotakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896065) Visitor Counter : 167


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Kannada