पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जानेवारी 2023 मध्ये स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) कडून आतापर्यंतचे सर्वोत्तम मासिक उत्पादन


कच्च्या स्टीलच्या उत्पादनात मागील सर्वोत्कृष्ट उत्पादनापेक्षा प्रभावी वाढ

Posted On: 03 FEB 2023 2:31PM by PIB Mumbai

 

पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने जानेवारी 2023 मध्ये आतापर्यंतचे सर्वोत्तम मासिक उत्पादन नोंदवले आहे. जानेवारी 2023 मध्ये 1.72 दशलक्ष टन कच्च्या स्टीलचे उत्पादन हे सेलचे आतापर्यंतचे सर्वोत्तम मासिक उत्पादन आहे. मार्च 2022 मध्‍ये झालेली वाढ ही या पूर्वीची सर्वोत्कृष्‍ट वाढ होती. त्याच्‍या तुलनेत सेलने जानेवारी 2023 महिन्‍यात हॉट मेटल 1.8 दशलक्ष टन  आणि विक्रीयोग्य स्टील 1.61 दशलक्ष टन  उत्‍पादन  केले आहे. हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्‍ट मासिक आहे. 

***

S.Bedekar/P.Jambhekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1895991) Visitor Counter : 236