माहिती आणि प्रसारण मंत्रालय

शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवात 'चित्रपट पाहण्यासाठी भाषा  सुलभता' या विषयावर आज एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली


वापरकर्त्यांना आपल्या पसंतीच्या भाषेत चित्रपटाचा संवाद ऐकता येईल असे  अ‍ॅप  या कार्यशाळेत प्रदर्शित  

Posted On: 29 JAN 2023 4:04PM by PIB Mumbai

 

शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवात आज 'चित्रपट पाहण्याच्या अनुभवात भाषा सुलभता' या विषयावर एक  कार्यशाळा आयोजित करण्यात आली.  कार्यशाळेत 'सिनेडब्स' (Cinedubs')नावाचे एक ऍप्लिकेशन प्रदर्शित करण्यात आले, ज्यामध्ये सिनेप्रेमींना त्यांच्या आवडीच्या (सोयीस्कर)भाषेतील  ऑडिओ उपलब्ध करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्याची क्षमता आहे.  डब्सवर्क मोबाईलचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आदित्य कश्यप यांनी सत्राचे संचालन केले.

सिनेडब्समुळे  वापरकर्त्यांना चित्रपटगृहात प्रादेशिक किंवा परदेशी भाषांमधील कोणत्याही भाषेतील चित्रपट चालू असला तरीही चित्रपटांचा आस्वाद आपल्याला सोयीस्कर भाषेतील घेण्यास सक्षम करते.  हे ॲप घरात बसून  चित्रपट पहाणाऱ्या सदस्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत तो चित्रपट आणि ओटिटी मंचावरील कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी देखील वापरता येईल.हे ॲप भाषेतील अडथळे दूर करण्यास मदत करते आणि कुटुंब आणि मित्रांना एकत्र बसून त्यांच्या इच्छित भाषेत चित्रपट पाहण्यास सक्षम करते.

हे ॲप टाइमस्टॅम्प ओळखून सुरू  असलेल्या (प्ले)मूळ भाषेतील ध्वनीची नोंद करतो आणि नंतर प्लेबॅक पार्श्वध्वनीसह पसंतीची भाषा बरोबर पकडतो(सिंक  करतो).आदित्य कश्यप यांनी  कार्यशाळेत प्रेक्षकांना या ॲपचे कार्य यशस्वीपणे दाखवून दिले.

आदित्य कश्यप यांनी सांगितले, की सिनेडब्समुळे  चित्रपट पहायला येणा-या प्रेक्षकांच्या संख्येत वाढ होऊन ते निर्मात्यांसाठी किफायतशीर बनतील.आर माधवन यांनी अभिनीत केलेला रॉकेटरीहा सिनेडब्स प्लॅटफॉर्मवरील पहिला  चित्रपट असल्याची माहिती त्यांनी प्रेक्षकांना दिली. मिशन इम्पॉसिबल पाहण्याचा पॅरिसमधील अनुभव हा ॲपची प्रेरणा आहे, असे  त्यांनी  नमूद केले.फ्रेंच थिएटर्समध्ये इंग्रजी भाषेचा पूर्ण अभाव असतो  त्यामुळे कश्यप यांना ॲपचा प्रयोग करण्यास प्रवृत्त केले.

कंपनीने सशुल्क वर्गणीदार बनवून  तसेच महसुलासाठी जाहिराती मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.   संस्थापक आदित्य कश्यप यांनी घोषणा केली की हे ॲप पहिल्या 10 लाख सदस्यांसाठी विनामूल्य उपलब्ध असेल.

***

N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894531) Visitor Counter : 173