माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सिनेमाच्या माध्यमातून सीमांचे बंधन मोडून काढणे, संस्कृतीचा शोध आणि भारताच्या वाढत्या लोकप्रियतेचे रहस्य या विषयावरील चर्चा सत्राने गाजवला एससीओ चित्रपट महोत्सवाचा दिवस


सिने क्षेत्रातील दिग्गज कलावंतांच्या विचारांनी एससीओ चित्रपट महोत्सवातील प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध

Posted On: 28 JAN 2023 10:33PM by PIB Mumbai

 

शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) चित्रपट महोत्सवाच्या विविध सत्रांमध्ये आज चित्रपट उद्योगातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. महोत्सवात चित्रपट प्रदर्शनाव्यतिरिक्त, संगीतापासून अॅनिमेशन आणि बौद्धिक संपदा अधिकारांपर्यंतच्या विविध विषयांवर चर्चा सत्रे आयोजित करण्यात आली होती.

महोत्सवात आजच्या दिवसाची सुरुवात द लास्ट फिल्म शोया गुजराती चित्रपटाच्या प्रदर्शनाने झाली. स्पर्धा विभागात कझाकस्तानचा मॉम आय ऍम अलाइव्ह!, रशियाचा पोडेलनिकी (द रॉयट), चीनचा बी फॉर बिझी आणि गोदावरी या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन झाले. 

आजच्या दिवसातली पहिली पॅनल चर्चा ‘Creating Infinite Worlds using Animation (अॅनिमेशन वापरून अनंताचे जग निर्माण करणे)या विषयावर होती. पॅनेलमधील सदस्यग्राफिटी मल्टीमीडियाचे संचालक मुंजाल श्रॉफ आणि टून्झ अॅनिमेशनचे सीईओ जयकुमार प्रभाकरन यांनी भारतीय अॅनिमेशन उद्योगातील त्यांचे अनुभव सांगितले. पॅनेलच्या सदस्यांनी सिनेमा आणि टेलिव्हिजन सांस्कृतिक आविष्कार आणि त्याचे सामाजिक परिणाम याच्याशी कसे जोडले गेले आहेत, यावर देखील चर्चा केली.

एससीओ क्षेत्रामधील भारतीय सिनेमाची वाढती लोकप्रियताया विषयावरील चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्यासह ख्यातनाम चित्रकर्मी राहुल रवैल आणि रमेश सिप्पी सहभागी झाले. पॅनेलच्या सदस्यांनी सिनेमावरील सांस्कृतिक प्रभावांसह भारतीय सिनेमाला इतका आकर्षक  बनवणाऱ्या घटकांवर चर्चा केली. सिनेमामधील पात्रांच्या साधेपणामुळे सीमारेषा पुसत झाल्याचं मत रमेश सिप्पी यांनी नोंदवलं. आशा पारेख म्हणाल्या की या संबंधांसाठी संगीत कारणीभूत आहे, तर राहुल रवैल यांनी भारतीय सिनेमासाठी असलेल्या आकर्षणाचे श्रेय त्याच्या कालातीत ताजेपणाला दिले.

कझाकिस्तानचे गायक आणि संगीतकार दिमाश कुडायबर्गेन यांच्याबरोबरच्या 'ब्रेकिंग बॅरियर्स' या 'फायर साइड चॅट'ने आजच्या दिवसाची सांगता झाली. स्टारडमपर्यंतचा आपला प्रवास सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल्यावर, दिमेश कुडैबर्गेन म्हणाले की संगीत ही एक भाषा आहे जी सर्व सीमा पार करते.   

दिमाश कुडायबर्गेन यांनी डिस्को डान्सर चित्रपटातील 'जिम्मी जिमी' हे हिट बॉलीवूड गीत गायलं आणि टाळ्यांच्या कडकडाटात, सहवास आणि परस्परांच्या सहकार्याच्या खऱ्या आविष्काराने आजच्या सत्राची आणि दिवसाची सांगता झाली.

***

S.Thakur/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894399) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi