इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

‘मेइटी’ स्टार्टअप हब आणि मेटा एक्सआर स्टार्टअप कार्यक्रमासाठी 120 स्टार्टअप्स आणि इनोव्हेटर्सची यादी जाहीर


३०% पेक्षा जास्त स्टार्टअप्स भारतातील द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरामध्‍ये

Posted On: 27 JAN 2023 4:36PM by PIB Mumbai

 

मेइटी स्टार्टअप हब (MeitY Startup Hub -MSH), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा एक उपक्रम आणि मेटा ने आज दिल्लीत एक्सआर स्टार्टअप कार्यक्रमासाठी 120 स्टार्टअप आणि नवकल्पकांची यादी जाहीर केली. सप्टेंबर 2022 मध्ये घोषित केल्यानुसार, एमएसएच आणि मेटा यांच्यातील विस्तारित रिअॅलिटी (एक्सआर) तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांचा शोध, शिक्षण आणि वेग वाढवण्यासाठीचा एक्सआर स्टार्टअप उपक्रम हा सहयोगी कार्यक्रम आहे.

या उपक्रमात प्रवेगक आणि ग्रँड चॅलेंजचा समावेश आहे. देशातील उदयोन्मुख तंत्रज्ञान परिसंस्थेला चालना देणे हा त्यामागचा हेतू आहे, असे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्टार्टअप दिनी सांगण्यात आला.

ॲक्सिलरेटर प्रोग्राममध्ये निवडलेल्या स्टार्टअपपैकी ३०% पेक्षा जास्त 2/3 श्रेणी शहरांतील आहेत. तसेच, ग्रँड चॅलेंजमध्ये निवडलेले 40% इनोव्हेटर्स आणि स्टार्टअप हे 2/3 श्रेणी शहरांतील आहेत. पुढे, 20% पेक्षा जास्त समूहामध्ये नवोदित महिला आणि महिला संस्थापक/सह-संस्थापकांसह स्टार्टअप आहेत.

एक्सआर सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा डिजिटल परिसंस्थेवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडेल. भारतीय स्टार्टअप्स आणि इनोव्हेटर्स, विशेषत: बिगर महानगरांमधील, मेटाव्हर्स आणि इंटरनेटच्या भविष्यासारख्या तंत्रज्ञानाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. मेटाशी सहकार्यामुळे अशा स्टार्टअप्सना समर्थन आणि स्केलिंग करण्यासाठी आवश्यक प्रेरणा मिळेल., असे एमएसएच चे मुख्य कार्यकारी अधिकारी जीत विजय यांनी यावेळी सांगितले.

शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी तंत्रज्ञान आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे भारत एक महत्त्वपूर्ण डिजिटल परिवर्तनातून जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) स्टार्टअप हबसह एक्सआर स्टार्टअप कार्यक्रमासारखे उपक्रम पुढे भारतभर तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांच्या वाढीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करतील. असे मेटा इंडियाच्या सार्वजनिक धोरण विभागाचे संचालक शिवनाथ ठुकराल, एक्सआर स्टार्टअप कार्यक्रमाच्या प्रारंभी बोलताना म्हणाले.

हा वेगवर्धक कार्यक्रम, एक्सआर तंत्रज्ञानामध्ये काम करणार्‍या प्रारंभिक टप्प्यातील 40 स्टार्ट-अपना सुमारे 20 लाख रुपये प्रत्येकी अनुदानाद्वारे समर्थन देत आहे. यापुढे जाऊन शैक्षणिक, शिक्षण आणि कौशल्य, आरोग्यसेवा, गेमिंग आणि मनोरंजन, कृषी तंत्रज्ञान आणि हवामान बदल कृती; पर्यटन आणि शाश्वतता यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रारंभिक टप्प्यातील नवोदितांना ग्रँड चॅलेंज द्वारे प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली (उत्तर विभाग) येथील फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर (एफआयटीटी ), भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (दक्षिण विभाग) येथील सेंटर फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप (सीआयई), सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजी बिझनेस इंक्युबॅशन फाउंडेशन ( पूर्व विभाग) (AIC- SMUTBI) येथील अटल इनक्युबेशन सेंटर आणि गुजरात विद्यापीठ स्टार्टअप आणि उद्योजकता परिषद (GUSEC) (पश्चिम क्षेत्र) येथे यांच्यासह अंमलबजावणी भागीदारांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविला जात आहे.

निवडक स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांची संपूर्ण यादी येथे दिली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय स्टार्ट अप केंद्राबाबत (MSH)

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय स्टार्ट अप केंद्र (MSH), हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. या उपक्रमात इतर क्रियाकलापांसह नवीन अनुदान योजना, कॉर्पोरेट स्टार्टअप कार्यक्रम आणि स्टार्टअपसाठी आंतरराष्ट्रीय विस्तार कार्यक्रम सुरू करून संपूर्ण भारतात स्टार्टअप प्रणाली विकसित करुन ती भक्कम करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. या  नेटवर्कमध्ये 4000 हून अधिक स्टार्टअप्स, 51 समर्थित आणि 476 नोंदणीकृत इनक्यूबेटर्स, 26 उद्योजकता केंद्रे (CoEs), 22 एक्सीलरेटर्स आणि 400 हून अधिक मार्गदर्शक जोडले आहेत.

 

मेटाविषयी माहिती -

लोकांना एकमेकांशी संपर्क करण्यात, समुदायाशी जोडले जाण्यात, आणि व्यवसाय वाढविण्यात मदत करणारे  तंत्रज्ञान मेटा तयार करते. 2004 मध्ये जेव्हा फेसबुक लाँच झाले, तेव्हा त्याने लोकांशी संपर्क साधण्याचा मार्ग बदलला. मेसेंजर, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप सारख्या ॲप्सनी जगभरातील अब्जावधी लोकांना अधिक सक्षम बनवले आहे. आता, मेटा 2D स्क्रीनच्या पलीकडे जाऊन सामाजिक तंत्रज्ञानामध्ये पुढील उत्क्रांती घडवण्यात मदत करण्यासाठी संवर्धित आणि आभासी  वास्तव या सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाकडे झेपावत आहे.

***

S.Patil/P.Jambhekar/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894129) Visitor Counter : 197