नौवहन मंत्रालय

ग्रेट निकोबार व्दीपवरील आंतरराष्ट्रीय पारगमन बंदरासाठी इच्छुकांकडून मागवणार प्रस्ताव


प्रस्तावित बंदराची दरवर्षी 16 दशलक्ष कंटेनर हाताळण्याची क्षमता, पहिल्या टप्प्यात 4 दशलक्ष कंटेनरची हाताळणी होणार

पारगमन बंदराबरोबरच परिसरामध्‍ये विमानतळ, नागरी वसाहत आणि वीज प्रकल्पही प्रस्तावित

Posted On: 27 JAN 2023 2:32PM by PIB Mumbai

 

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचे स्थान - ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणजेच एका जहाजावरून दुस-या जहाजावर माल चढविण्‍यासाठी उपयोगी ठरणारे पारगमन बंदर. ग्रेट निकोबार  व्दीप हे आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गावर स्थित आहे. हे बेट सिंगापूर, क्लांग आणि कोलंबो या देशांच्या  विद्यमान  बंदराजवळ आहे.

स्वरूप - २० मीटर ची नैसर्गिक खोली

पाणलोट क्षेत्र- या उपखंडात तसेच येथून जवळच्या भागामध्‍ये भारतीय बंदरांसह इतर देशांनाही  कार्गोसाठी सेवा देणे शक्य. 

टप्पा 1 अंतर्गत प्रकल्पाची वैशिष्ट्ये - दोन ब्रेकवॉटर, 400 मीटर रुंद नेव्हिगेशनल / जहाजांना मार्ग बदलण्‍यासाठी मार्गिका, 800 मीटर रुंद वळण मार्गिका, 7 मार्गिकांमध्ये परावर्तीत होणा-या मार्गिकेची एकूण लांबी सुमारे 2.3 किमीकंटेनर यार्डसाठी 125 एचए. आरएमक्यूसी आणि आरटीजीसह कंटेनर हाताळणी उपकरणांची उपलब्धता, द्रवरूप कार्गोसाठी 2 मार्गिका विकसित करण्याची तरतूद

सरकारने जाहीर केलेल्या व्दीप विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने  ग्रेट निकोबार बेटाच्या सर्वांगीण विकासाचा कार्यक्रम तयार केला आहे. अंदमानातील ग्रेट निकोबर बेट आणि बंगालच्या उपसागरातील निकोबार बेटांशी संलग्नित ग्रेट निकोबार बेटाच्या गॅलाथिया खाडीवर मेगा इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट (आयसीटीपी) म्हणजेच आंतरराष्ट्रीय पारगमन बंदर विकसित  करण्‍यात येणार आहे. याशिवाय बंदराबरोबरच परिसरामध्‍ये विमानतळ, नागरी वसाहत विकसीत करणे आणि वीज प्रकल्प यांचे काम करण्‍यात येणार आहे.  याशिवाय, इथल्या प्रस्तावित पायाभूत सुविधा या जगातील सर्वोत्तम कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल’  आणि आसपासच्या बंदरांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधांच्या गुणवत्तेशी बरोबरी साधणाऱ्या असतील.

हा प्रकल्पाच्या  परिचालनाशी संबंधित तीन प्रमुख घटकंवर भर दिला आहे. ज्यामुळे हे ठिकाण एक आघाडीचे कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्टम्हणजेच एका जहाजावरून माल उतरवून, तो इच्छित स्‍थानी पाठविण्‍यासाठी- पुढच्या प्रवासासाठी दुस-या जहाजावर चढविण्‍याची सुविधा असलेले बंदर बनू शकणार आहे.  या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शिपिंग व्यापारी  मार्ग सागरी 40 मैल अंतरावर आहे. तसेच  मोठ्या जहाजांसाठी आवश्‍यक असणारी पाण्याची 20 मीटरपेक्षा जास्त नैसर्गिक खोली उपलब्ध आहे.  भारतीय बंदरांसह नजीकच्या, परदेशी बंदरांमधून ट्रान्सशिपमेंट कार्गोची वाहतूक करण्याची क्षमता असल्यामुळे  या ठिकाणाला धोरणात्मक पातळीवर आपोआपच महत्वाचे स्थान मानले जाते.

प्रस्तावित सुविधा चार टप्प्यात विकसित केली जाणार असून त्याचा एकूण अंदाजित खर्च 41000 कोटी रुपये आहे. पहिला टप्पा 2028 मधे 4 दशलक्ष टीईयू हाताळणी क्षमतेसह कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित असून, विकासाच्या अंतिम टप्प्यात त्याची क्षमता 16 दशलक्ष टिईयू पर्यंत वाढेल.

प्रस्तावित ट्रान्सशिपमेंट बंदराच्या पहिल्या टप्प्यासाठीचा अंदाजित खर्च 18,000 कोटी आहे. यात जलरोधक भिंतीचे बांधकाम, गाळ उपसा, भरणी घालणे, जहाज नांगरणीची जागा, साठवणूक परिसर, इमारत आणि सोयी सुविधा, उपकरणांची खरेदी तसेच त्यांना  स्थापित करणे आणि मुख्य पायाभूत सुविधांसह बंदर वसाहतीचा विकास समाविष्ट असून हे  शासनाच्या सहकार्याने विकसित करण्यात येणार आहे.

हा प्रकल्प विकसित होत असल्यामुळे भारताच्या दृष्‍टीने एक आत्मनिर्भर आणि स्वावलंबी राष्ट्र बनण्‍यासाठी महत्त्वाची खूण ठरेल. तसेच देशाच्या आर्थिक विकासाला पाठबळ देईल असे, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री, सर्बानंद सोनोवाल एमओपीएसडब्लूच्या या महत्वाच्या प्रसंगी आनंद व्यक्त करताना म्हणाले.

आपले द्रष्टे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतला नवीन भारत घडवण्याच्या भव्य संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय सतत प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.

कोलकात्यातील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर (एसएमपीके), एमओपीएसडब्लूच्या वतीने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी असून प्रस्तावित प्रकल्पाची देखभाल आणि फायदेशीर वाढ होण्यासाठी संबंधित तांत्रिक कौशल्य, आर्थिक क्षमता आणि विकास, कार्यान्वयनासाठी आवश्यक कार्य अनुभव असलेल्या इच्छुक संस्थांना आमंत्रित केले जाईल.  याबाबतची माहिती एसएमपीकेच्या https://smportkolkata.shipping.gov.in आणि https://kopt.enivida.in  या संकेतस्थळावर 28 जानेवारी 2023 पासून उपलब्ध असेल.

अर्ज दाखल करण्याची तारीख, मुदतवाढ, स्पष्टीकरण दुरुस्ती इत्यादीसह इतर सर्व तपशील वरील संकेतस्थळावर वेळोवेळी अद्ययावत केले जातील.  सर्व अटी आणि शर्ती ईओआयच्या अधिसूचनेनुसार असतील.

***

S.Bedekar/T.Pawar/V.Ghode/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894097) Visitor Counter : 185


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu