आदिवासी विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाद्वारे आदिवासी कल्याणाचं दर्शन घडवणारा चित्ररथ, आदिवासी व्यवहार मंत्रालयानं केला सादर

Posted On: 26 JAN 2023 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जानेवारी 2023

देशभरातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी स्थापन केलेल्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाद्वारे आदिवासी कल्याणाचं दर्शन घडवणारा चित्ररथ, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयानं आज राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सादर केला.  आपल्या गौरवशाली आदिवासी वारशाचा सन्मान करणं, हा यामागील दृष्टीकोन आहे.

राष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि भरभक्कम  अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचं दर्शन घडवणाऱ्या एकूण 23 चित्ररथांनी, आज  26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये भाग घेतला. यात राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 17 आणि विविध मंत्रालयं/विभागांच्या 6 चित्ररथांचा समावेश होता.

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल (EMRS) योजना हा विषय रेखाटणारा आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा चित्ररथ प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात झळकल्यामुळेहे वर्ष आदिवासी व्यवहार मंत्रालयासाठी विशेष ठरलं.

या चित्ररथाच्या दर्शनी भागात, मंत्रालयाचा भर असलेल्या नारीशक्ती वर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं. ही नारीशक्ती, ई एम आर एस योजनेत आदिवासी मुला-मुलींची समान नोंदणी  करून, मुलींच्या शिक्षणाला दिलेल्या प्राधान्याच्या रुपात प्रतीकात्मक दर्शवण्यात आली होती. शिक्षणाच्या माध्यमातून जग जिंकण्याचा आदिवासी विद्यार्थ्यांचा मनोदय, या चित्ररथातून ठळकपणे व्यक्त होत होता.  शिक्षणाचं प्रतीक म्हणून एक पुरातन लेखणी, एकलव्याच्या धनुष्यबाणाच्या आकारात मांडली होती.  EMRS चे आदिवासी विद्यार्थी जे ध्येय समोर ठेवून त्यांचं भविष्य घडवतात आणि त्यांची स्वप्नं साकार करतात, ते ध्येय या प्रतिकातून प्रतिबिंबित होत होतं. चित्ररथाच्या   मागील भागात ज्ञानवृक्ष साकारला होता.  EMRS च्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांमध्ये होणारा ज्ञान आणि विद्वत्तेचा प्रसार, तसंच आदिवासी संस्कृतीचं त्यांच्याच नैसर्गिक अधिवासात संवर्धन हे EMRS चं उद्दिष्टं आहे. हे उद्दिष्टच या ज्ञानवृक्षातून ध्वनित होत होतं.

 

 R.Aghor/A.Save/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1894019) Visitor Counter : 215