पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाबाहू ब्रम्हपूत्रेवरील कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या क्रुझला केन्द्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी केले रवाना

Posted On: 24 JAN 2023 2:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023

बंगळुरू येथे 6-8 फेब्रुवारी 2023 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या भारत ऊर्जा सप्ताह 2023 (आयईडब्लू 2023) च्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप एस. पुरी यांनी आज मिथेनॉल मिश्रित डिझेलचा (एमडी15) वापर केल्या जाणाऱ्या अंतर्देशीय जहाजाचे समारंभपूर्वक उद्घाटन केले.  केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली हे देखील यावेळी उपस्थित होते.

'एसबी गंगाधर' नावाच्या 50 आसनी नौकेतून त्यांनी यावेळी विहार केला. ही नौकादोन रस्टन मेक डिझेल इंजिनने (105 एचपी  प्रत्येक इंजिन) सुसज्ज आहे.   एमडी-15 (15% मिथेनॉल मिश्रित एचएसडी) इंधनावर ही नौका चालवली जाईल.

मिथेनॉल हे कमी कार्बन उत्सर्जन करणारे हायड्रोजन वाहक इंधन आहे. राख, कोळसा, कृषी अवशेष, औष्णिक उर्जा प्रकल्पांमधील कार्बन डायऑक्साईड  आणि नैसर्गिक वायूपासून हे तयार केले जाते.  कॉप 21 प्रति  भारताची वचनबद्धता पूर्ण करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत ऊर्जा क्षमतेत किंचित कमी असले तरी, मिथेनॉल या दोन्ही इंधनांना वाहतूक क्षेत्र (रस्ता, रेल्वे आणि सागरी), ऊर्जा क्षेत्र (डीजी सेट, बॉयलर, प्रक्रिया हीटिंग मॉड्यूल्स, ट्रॅक्टर आणि व्यावसायिक वाहने यांचा समावेश आहे) आणि स्वयंपाक इंधनासाठी (एलपीजी [अंशत:], रॉकेल आणि लाकडी कोळसा). पर्याय ठरु शकते. 

"आसाममध्ये, आसाम पेट्रोकेमिकल लिमिटेड (एपीएल), नामरूप सध्या सुमारे 100 टीपीडी मिथेनॉलचे उत्पादन करत असून मिथेनॉलच्या 500 टीपीडी उत्पादनासाठी एक नवीन प्रकल्प राबवत आहे." असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. "देशात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून कोळशापासून मिथेनॉल प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. बीएचईएल (हैदराबाद आणि त्रिची), थरमॅक्स आणि आयआयटी दिल्ली द्वारे ते विकसित केले जात आहे." असेही त्यांनी सांगितले.

भारताच्या तेल आयातीचा खर्च, हरितगृह वायू (जीएचजी) उत्सर्जन कमी करणे आणि कोळशाचे साठे तसेच नगरपालिकेतील घनकचऱ्याचे मिथेनॉलमध्ये रूपांतर करणे हे नीती आयोगाच्या 'मिथेनॉल अर्थव्यवस्था' कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.

जलवाहतुकीच्या दृष्टीने मिथेनॉल हे किफायतशीर पर्यायी इंधन आहे. हे इतर  इंधनापेक्षा कमी खर्चिक आहे. किनाऱ्यावरील साठवणूक आणि संबंधित पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने किफायतशीर आहे.  मिथेनॉलवर चालण्यासाठी जहाजात बदल  करण्यासाठी लागणारा खर्च इतर पर्यायी इंधन रूपांतरणांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. बदलानंतर महागड्या एक्झॉस्ट वायूचीही आवश्यकता नाही आणि द्रव इंधन म्हणून, मिथेनॉल हाताळण्यासाठी विद्यमान साठवणूक आणि संबंधित पायाभूत सुविधांसाठी फक्त किरकोळ बदल आवश्यक आहेत.

इंधनात 15% मिथेनॉल मिसळल्याने इंधन/कच्च्या तेलाच्या आयातीत किमान 15% कपात होऊ शकते.  या व्यतिरिक्त, यामुळे, एनओएक्स आणि एसओएक्सच्या बाबतीत जीएचजी उत्सर्जन 20% कमी होईल, ज्यामुळे शहरी हवेची गुणवत्ता सुधारेल.

भारतीय उर्जा सप्ताहाबाबत :

आयईडब्लू 2023  हा भारताच्या जी20 अध्यक्षतेखालील पहिला मोठा कार्यक्रम आहे.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉप26 मध्ये2070 पर्यंत भारताचे उत्सर्जन निव्वळ-शून्य पर्यंत कमी करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याप्रती हा सप्ताह वचनबद्धता दर्शवतो.

भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीत  भारत ऊर्जा सप्ताह आयोजित केला आहे. सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (पीएसयू) सहभागासह आणि अधिकृतपणे भारतीय पेट्रोलियम उद्योग महासंघाद्वारे (एफआयपीआय) समर्थित, सरकारने, सर्वोच्च स्तरावर समर्थित केलेला एकमेव आणि सर्वसमावेशक असा हा आंतरराष्ट्रीय ऊर्जा कार्यक्रम आहे.

 

 

 

 

 

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1893235) Visitor Counter : 235


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu