अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भरड धान्यावर लक्ष केंद्रित करून अन्नप्रक्रिया  क्षेत्रातील सर्व भागधारकांना  एका समान व्यासपीठावर आणण्याच्या दृष्टीने मध्य प्रदेशातील मंडला येथे दोन दिवसीय भरड धान्य परिषदेचे आयोजन

Posted On: 21 JAN 2023 9:36PM by PIB Mumbai

 

अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी मध्य प्रदेशात मंडला येथे भरड धान्य महोत्सवाचे आज उद्घाटन केले.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर भरड धान्यांचे पोषणमूल्य , भरड धान्यांचे मूल्य वर्धन, वापर आणि निर्यातीच्या दृष्टीने भरड धान्यांची क्षमता याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय महाराष्ट्रासह देशातील वीस राज्यांमध्ये आणि 30 जिल्ह्यांमध्ये भरड धान्य महोत्सवाचे आयोजन करत आहे.

 भरड धान्य महोत्सव अंतर्गत अनेक उपक्रमांना 21 आणि 22 जानेवारी 2023 रोजी मध्य प्रदेशातील मंडला येथून आरंभ करण्यात आला. मंडला  हे कोदो आणि कुटकी या भरड धान्यांच्या उत्पादनाचे केंद्र आहे.

आपल्या उद्घाटनाच्या भाषणात प्रल्हाद सिंह पटेल यांनी भरड धान्यांचे महत्व सांगितले आणि भरड धान्यांवर आधारित मूल्यवर्धक उत्पादनांना बाजारपेठेच्या दृष्टीने असलेले अपार महत्व विशद केले. अन्नप्रक्रिया क्षेत्राला सहाय्य करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून जी अनेक पावले उचलली जात आहेत त्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांना माहिती दिली.

***

S.Kane/V.Sahajrao/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1892761) Visitor Counter : 313


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu