पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
जी20च्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या (ECSWG) पहिल्या बैठकीचे बंगळूरुत 9-11 फेब्रुवारी 2023 दरम्यान होणार आयोजन
Posted On:
21 JAN 2023 2:12PM by PIB Mumbai
भारत जी20 संघटनेचे 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत एका वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्षपद भूषवणार आहे. या मंचावर जी20 सदस्य देश, अतिथी देश आणि भारताने निमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना एकत्र येणार आहेत. प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी आणि शिफारशी करण्यासाठी शेर्पा ट्रॅकच्या माध्यमातून भारताच्या अध्यक्षतेखाली 13 कार्यगट आणि 2 उपक्रमांच्या बैठका होतील. पर्यावरण, हवामान आणि शाश्वतता हा शेर्पा ट्रॅक अंतर्गत असलेल्या कार्यगटांपैकी एक आहे. पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या चार बैठकांचे आयोजन पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे. ईसीएसडब्लूजीच्या बैठकीत 'किनारपट्टी शाश्वततेसह नील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन', 'अवनती झालेल्या भूमीचे आणि परिसंस्थांचे पुनरुज्जीवन', 'जैवविविधतेमध्ये वाढ' आणि 'चक्राकार अर्थव्यवस्थेला बळकटी' या विषयांवर भर दिला जाणार आहे.
भारताच्या जी20 अध्यक्षते अंतर्गत जी20च्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या(ECSWG) पहिल्या बैठकीचे बंगळूरुत द ताज वेस्ट एंड येथे 9-11 फेब्रुवारी,2023 दरम्यान आयोजन होणार आहे. बंगळूरुमध्ये होणाऱ्या पहिल्या बैठकीचे औचित्य साधून मैसुरू प्राणीसंग्रहालयाने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या समन्वयाने 18 आणि 19 जानेवारी 2023 रोजी भारतीय प्राणीसंग्रहालयाच्या संचालकाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले. या परिषदेमध्ये प्रामुख्याने प्रजाती व्यवस्थापन आणि प्रजनन संवर्धनासाठी राष्ट्रीय क्षमता उभारणी आणि बृहद आराखडा यावर भर देण्यात आला. 25 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाचे एकूण 59 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. मैसुरु शहराच्या महापौरांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले आणि संवर्धन पद्धतींकडे लक्ष वेधण्यात या परिषदेला यश आले. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दाखल झालेल्या जी20 प्रतिनिधींसाठी बंगळूरुमधील कलकेरे वाटिका आणि बाणेरघट्टा जीवशास्त्रीय उद्यानाच्या अभ्यास सहलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1892672)
Visitor Counter : 208