गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भूषविले, पोलीस महासंचालक / पोलीस महानिरीक्षकांच्या 57 व्या परिषदेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान
प्रविष्टि तिथि:
20 JAN 2023 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2023
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत 57 व्या पोलीस महासंचालक / पोलीस महानिरीक्षक परिषदेचे उद्घाटन केले. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक/महानिरीक्षक आणि केंद्रीय सशस्त्र दलांचे प्रमुख या परिषदेसाठी उपस्थित आहेत. प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने आयोजित या परिषदेला विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील विविध श्रेणीचे सुमारे 600 अधिकारीही उपस्थित आहेत.

2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनविण्याच्या आणि 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनांवर अमित शहा यांनी आपल्या भाषणात भर दिला. जम्मू-काश्मीर, ईशान्य प्रांत अंतर्गत सुरक्षा योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला. येत्या दहा वर्षांत नक्षलवादासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठीचा आराखडा त्यांनी मांडला . केंद्रीय गृह मंत्रालयाने सार्वजनिक डिजिटल वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी विशेष दृष्टीकोन मांडला. त्याशिवाय, पोलिस दलांची क्षमता वृद्धी करणे आणि या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा क्षेत्रे सुरक्षित करण्याबद्दल त्यांनी मते व्यक्त केली. अंमली पदार्थ तस्करी, हवाला आणि शहरी पोलिसिंग यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये उत्तम समन्वय राखला जावा, असे आवाहन त्यांनी केले.

आज परिषदेच्या पहिल्या दिवशी नेपाळ आणि म्यानमारच्या सीमारेषेवरील सुरक्षा आव्हाने, भारतात अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची ओळख पटविण्यासाठीची धोरणे आणि माओवाद्यांच्या प्रमुख अड्ड्यांना लक्ष्य करणे यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. पुढील दोन दिवसांत, देशातील सर्वोच्च पोलीस नेतृत्व तज्ज्ञ, क्षेत्रीय अधिकारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील उदयोन्मुख सुरक्षा आव्हाने आणि संधी यावर विचारविनिमय होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते आज गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकांचे वितरण आणि देशातील पहिल्या तीन पोलीस ठाण्यांना चषके प्रदान करण्यात आली.
R.Aghor/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1892605)
आगंतुक पटल : 342